आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘निर्भय’द्वारे विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे; के. के. वाघ महाविद्यालयात विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थिनींना स्वसंरक्षण करता यावे या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे महाविद्यालयांत निर्भय कन्या अभियान राबविले जाते. महाविद्यालयातील विद्यार्थिनींची छेडछाड होण्याचे प्रकार वाढले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींना स्वतःचे रक्षण करता यावे यासाठी निर्भय कन्या अभियानातून त्यांना कराटेचे प्रशिक्षण दिले जाते. पुणे विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयात अशा प्रकारचे अभियान राबविण्यात आले आहे.या अभियानामुळे विद्यार्थिनी निर्भय बनल्या असून कराटेच्या प्रशिक्षणामुळे स्वतःच्या रक्षणासाठी इतरांच्याही रक्षण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होत आहे.

के. के वाघ शिक्षण संस्था संचालित के. के. वाघ वरिष्ठ महाविद्यालय, नाशिक आणि चांदोरी येथे विद्यार्थी विकास मंडळाच्या निर्भय कन्या अभियान योजनेअंतर्गत नुकतेच विद्यार्थिनींसाठी व्यक्तिमत्त्व आरोग्य तसेच स्वयंप्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानासाठी डॉ. कावेरी धात्रक, डॉ. प्राजक्ता महाले, अॅड. जास्वंदी भानोसे, डॉ. लता पवार आणि डॉ. उज्ज्वला शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या दुस‍ऱ्या सत्रात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षक रमेश भडांगे यांनी उपस्थित मुलींना कराटेचे प्रशिक्षणाचे धडे दिले. याप्रसंगी समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर व नाशिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.पी. राजपूत, चांदोरी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. के. दातीर, विभाग प्रमुख डॉ. अनुराधा नांदुरकर, प्रा. अर्चना बेंडाळे, प्रा. अर्चना कोते वरिष्ठ शिक्षक प्रा.वर्षा मिस्त्री, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. देविदास दुर्गेष्ट, प्रा. मयूर उशीर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...