आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

43 व्या स्पर्धेला प्रारंभ:स्व. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धा पुढील वर्षापासून सर्व शाळांसाठी खुली

नाशिकराेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संस्थास्तरावर असलेली कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धा पुढील वर्षापासून संस्थेच्या शाळे व्यतिरिक्त इतर शाळांसाठी खुली करण्यात येणार आहे, अशी घाेषणा नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ. राजेंद्र कलाल यांनी केले.

मंडळाच्या वतीने ४३ व्या कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (दि. १५) येथील पुरुषाेत्तम इंग्लिश स्कूलच्या धामणकर सभागृहात झाले. याप्रसंगी डाॅ. कलाल बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणूनअभिनेता अभिषेक रहाळकर व बाल कलाकार सृष्टी पगारे उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला, कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष मारुती कुलकर्णी, खजिनदार अनिल दहिया आदी उपस्थित होते. येवला यांनी प्रास्ताविक केले. अभिनेता अभिषेक रहाळकर म्हणाला की, चित्रपट अथवा नाटकात काम करताना स्टेजवर कसे वागावे यासाठी मोठ्या रकमा भरून क्लास लावावा लागतो. परंतु पुरोहित एकांकिका स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच स्पर्धेत भाग घ्यायला संधी मिळत आहे. तसेच नाटकाने स्टेज डेरिंग मिळते. तर बालकलाकार सृष्टी पगारे म्हणाली की, जे आवडत असेल त्यात भाग घेतला पाहिजे, यातून आनंद मिळतो.

यावेळी तिने स्वामिनी मालिकेतील गाणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन शारदा थोरात व हेमंत देशपांडे यानी केले. आभारप्रदर्शन स्पर्धा सहप्रमुख राहुल मुळे यांनी मानले. कार्यक्रमास प्राचार्य संजय चव्हाण, मुख्याध्यापिका सुचेता कुकडे, मंगला गोविंद, जयकुमार टिबरेवाला, ज्योती मोदीयानी, आरंभ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संगीता पवार, कामिनी पवारसह शाळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या एकांकिका सादर
नवीन मराठी शाळा ( प्रायश्चित्त), टिबरेवाला स्कूल ( चला जगू या मनमोकळे, श्रीमती र. ज. चौहान बिटको कन्या विद्यालय (दुधावरची साय ), देशमुख महिला महाविद्यालय (बळीराजाचा बळी), पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल ( गुणांच्या सावल्या ), आरंभ महाविद्यालय ( वाकडेवाडीचं भूत ) या एकांकिका सादर केल्या. यानंतर संस्थेच्या नाशिक, सिन्नर, ईगतपुरी, नांदगाव या संकुलात एकांकिका सादर केल्या जाणार आहेत.

अंतिम स्पर्धा २४ डिसेंबर राेजी
या एकांकिका स्पर्धेतील अंतिम स्पर्धा शनिवारी (दि. २४) नाशिकराेड येथील पुरुषाेत्त इंग्लिश स्कूलच्या धामणकर सभागृहात हाेणार आहे. यानंतर या स्पर्धांचे बक्षीस वितरण त्याच दिवशी याच सभागृहात दुपारी ३ वाजता हाेईल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते चिन्मय उदगीरकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...