आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमएसएमई योजनेचा फायदा:आत्मनिर्भर भारत लघु व मध्यम उद्योजकांसाठी मोठी संधी, टॅक्स प्रॅक्टीशनर्सच्या कार्यशाळेत प्रदीपजी पेशकर यांचे प्रतिपादन

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमएसएमई योजनेच्या मदतीने भारत सरकार छोट्या उद्योगांना आर्थिक सहाय्य देते. या योजनेची स्थापना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे. देशातील लहान, आणि मध्यम उद्योगांना विकसित करण्यासाठी व आवश्यकतेनुसार मदत उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना कार्य करते. मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचं खरं चित्र आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. भारताच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारी हि योजना आहे व उद्योजकांसाठी मोठी संधीही असल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या एमएसएमई बाेर्डचे सदस्य प्रदीप पेशकर यांनी केले.

टॅक्स प्रॅक्टीशनर्स असाेसिएशन च्यावतीने उद्याेजकांसाठी आयाेजित कार्यशाळेत पेशकर मार्गदर्शन करीत हाेते. व्यासपीठावर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र बकरे व पदाधिकारी हाेते.

केंद्र सरकारच्या या याेजनांव्दारे कमी व्याजदराने कर्ज मिळण्यास मदत होते तसेच सरकारी टेंडर्स मिळण्यास मदत होते सरकारी परवाने, मंजुरी, मिळवणे सोपे होते. प्रत्यक्ष कर कायद्या अंतर्गत सूट मिळते.याच बरोबर महिला उद्योजकांसाठी काही विशेष योजना आहेत या योजनांचा लाभ अधिका अधिक व्यासायिकांनी घ्यावा असे आवाहन पेशकर यांनी यावेळी केले. करसल्लागार हे व्यवसायिक उद्योजकांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात त्यांच्या आर्थिक नोंदींची माहिती घेऊन कर भरणा करत असतात यामुळे ते एकप्रकारे राष्ट्र निर्मितीच्या कार्यातील घटक असल्याची जाणीव करून देऊन, उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच विस्तारीकरणासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यामध्ये आपलं सुद्धा भरीव योगदान असलं पाहिजे. केवळ जिल्हा उद्योग केंद्र यावरच अवलंबून न राहता उद्योग व्यवसायासाठी केंद्र सरकार व काही प्रमाणात राज्य सरकारकडून विविध योजना अस्तित्वात आहेत. आपण आपल्या कार्याची सीमा वाढवली पाहिजे कर सल्लागार म्हणून काम करत असताना आपण औद्योगिक धोरणाचा अभ्यास केला पाहिजे, विविध प्राधिकरणाच्या बँकांच्या अधिकाऱ्यांशी आपले संबंध प्रस्थापित केले पाहिजे याकडे पेशकर यांनी लक्ष वेधले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश विसपुते यांनी केले व आभार प्रदर्शन रुपाली तिवारी यांनी केले.कार्यशाळेच्या आयाेजनाकरिता अक्षय सोनजे, नितीन डोंगरे, मनोज धाडीवाल, प्रकाश विसपुते, योगेश कातकाडे, अनिकेत कुलकर्णी, संदीप गाढवे आदींनी परिश्रम घेतले.

----------

फाेटाे ओळी - करसल्लागारांना मार्गदर्शन करतांना भारत सरकारच्या एमएसएमइ बाेर्डचे सदस्य प्रदीप पेशकर समाेर उत्तर महाराष्ट्रातून उपस्थित असलेले कर सल्लागार.

बातम्या आणखी आहेत...