आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्राम विकासातूनच स्वयंपूर्ण व समृद्ध देशाची निर्मिती घडू शकते, हे महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या स्वामी समर्थ सेवामार्गातून घडत असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात सद्गुरू प. पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या शिलापूजन सोहळ्यात शहा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. याप्रसंगी प्रत्यक्ष उपस्थितीत असलेल्या हजाराे सेवेकऱ्यांशी ते बाेलत हाेते. व्यासपीठावर गुरुमाऊली मोरे यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, आ. सीमा हिरे, आ. हिरामण खोसकर, उद्योगपती शिवांशू पांडे, राजेश शाह, विनोद जैन, शिरीष शाह, रजनीश कुमार, चंद्रकांत दादा माेरे, नितीन मोरे, आबासाहेब मोरे, डॉ. दिकपाल गिरासे, प्रमोद रहाणे उपस्थित होते. यावेळी शहा म्हणाले की, त्र्यंबकेश्वरला उपस्थित राहण्यासाठी तयारी दर्शवली हाेती. मात्र, अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहता आले नाही. रामायणकालीन घटनांचा साक्षीदार असलेली ही भूमी आहे. गोरगरिबांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी सर्व अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय सेवा मार्गातून उभे राहत आहे. याचा भविष्यात हजारो रुग्णांना लाभ होणार आहे. गुरूमाऊली यांनी करोडो रुपयांचे हे हॉस्पिटल सेवेकऱ्यांच्या एक-एक रुपयातून उभे करत असल्याचा आनंद आहे.
समाजाला दिशा देण्याची परंपरा सेवामार्ग ७० वर्षांपासून जोपासत आहे. सात हजार सेवा केंद्रांच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा, ग्राम व नागरी विकास शेतकऱ्यांना मदत सेवामार्ग पोहोचतो आहे. मी लवकरच गुरुपीठात येणार असल्याचा पुनरुच्चार शहा यांनी केला.
शांतता, सुबत्ता राखणार
अण्णासाहेब मोरे यांनी ही उपस्थित सेवेकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, देशात शांतता, सुबत्ता नांदण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा व त्यांचे प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांना या कार्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचा कायम आशीर्वाद आहे. याेगदिनाचे महत्वही त्यांनी विशद केले. गुरुपीठ आवारात बालसंस्कार विभागाच्या वतीने लहान मुलांनी विविध योगासने करुन हा दिवस साजरा केला. परदेशातून अमेरिका, दुबई, नेपाळ, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया या देशातूनही सेवेकरी आले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.