आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र साहित्य परिषदेची नाशिक शाखा गेल्या काही वर्षांपासून बंदच होती. २०१५मध्ये ही शाखा कार्यान्वित करण्यात आली. अध्यक्षपदी विनायदादा पाटील यांची नियुक्तीही करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही शाखेचे काहीच कामकाज पुढे सरकले नव्हते. तेव्हापासून आजपर्यंत साहित्यविषयक एकही कार्यक्रम शाखेने घेतला नाही. साहित्य संमेलन काळात यावर बरीच चर्चा झाल्यानंतर आता मसापची सर्वात जुनी नाशिक शाखा नव्याने कार्यान्वित करण्यात आली असून अध्यक्षपदी प्राचार्य डॉ दिलीप धोंडगे तर कार्योध्यक्षपदी ज्येष्ठ कवी नरेश महाजन यांची निवडक करण्यात आली आहे.
अध्यक्षाविना कामकाज थंडबस्त्यात
नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्यिक उपक्रम सुरू असतानाही त्यात मसापच्या नाशिक शाखेचा कधी साधा उल्लेखही होत नसे. साहित्याची मोठी परंपरा असलेल्या या शहरात मसापचे काम आहे की, नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. मसापे कार्यकारी मंडळ याविषयी बैठका घेत. मात्र आजपर्यंत पुढे काहीही घडले नाही. दरम्यान, शाखेचे कार्याध्यक्ष किशोर पाठक आणि अध्यक्ष विनायकदादा पाटील यांचे निधन झाले. अध्यक्षच नसल्याने शाखेचे कामकाज पूर्णच थंडबस्त्यात गेले. कार्यकारिणीतील काही सदस्यांनी शाखेला पुनरुज्जीवती करण्याचा प्रयत्न केला. त्याला यश येत रविवारी मसाप, पुणे शाखेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी स्वत: लक्ष घालून नाशिकमधील कार्यकारी मंडळाची बैठक घेतली आणि घटनेतील तरतुदीनुसार अध्यक्षपदी प्रा. धोंडगे, कार्याध्यक्षपदी नरेश महाजन यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी मसापचे जिल्हा प्रतिनिधी प्रकाश होळकर उपस्थित होते.
बाडबिस्तर कुसुमाग्रज स्मारकात
मसापचे कामकाज पूर्वी सार्वजनिक वाचनालयात सुरू होते. मात्र २०१४०-१५मध्ये नव्याने कार्यकारिणी करण्यात आली आणि हे बाडबिस्तर कुसुमाग्रज स्मारकात नेण्यात आले. पण, सार्वजनिक वाचनालयात ते जसे कपाटबंद होते. तसेच स्मारकातही गेली सात वर्षे कपाटबंदच राहिली. विनायकदादांनी फक्त दोन ते तीन वेळा कार्यकारी मंडळाची बैठक घेतली. त्यापुढे काहीही घडले नाही. आमदार बाळासाहेब थोरात यांना सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार त्यावेळी प्राप्त झाला होता. पुरस्काराची पन्नास हजार रुपये रक्कमही त्यांनी मसापच्या नाशिक शाखेला दिलेली आहे. त्यामुळे आता तरी शाखेने साहित्यविषयक कार्यक्रम घ्यावे अशी अपेक्षा साहित्यप्रेमी व्यक्त करत आहेत.
शाखेची कार्यकारिणी अशी
अध्यक्ष : प्रा. डॉ. दिलीप धोंडगे
उपाध्यक्ष : डॉ. रमेश वरखेडे
कार्याध्यक्ष : नरेश महाजन
प्रमुख सचिव : स्वानंद बेदरकर कोषाध्यक्ष : लोकेश शेवडे सदस्य : अपर्णा वेलणकर, मुक्ता चैतन्य, पीयूष नाशिककर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.