आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Senior Scientist And Scientific Writer Dr. Selection Of Jayant Narlikar Will Be President Of 94th Marathi Sahitiya Sammelan Held In Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहित्य संमेलन:94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साहित्य संमेलन 26 ते 28 मार्च दरम्यान नाशिक येथे होणार आहे

यावर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पाहिल्यांदाच डॉ. जयंत नारळीकर यांच्या रुपाने वैज्ञानिक साहित्यीकाला संधी मिळणार आहे.

यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेकांचे नावे चर्चेत होती. अखेरच्या क्षणापर्यंत जयंत नारळीकर आणि भारत सासणे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. मात्र साहित्य मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या चार तास चाललेल्या बैठकीनंतर नारळीकरांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. साहित्य संमेलन येत्या 26 ते 28 मार्च दरम्यान नाशिक येथे होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...