आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धापन दिन:‘संध्याछाया’ संघातर्फे ज्येष्ठांचा सत्कार‎

नाशिक‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाेंविदनगर येथील संध्याछाया ज्येष्ठ‎ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त‎ विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात‎ आले. ८० वर्षांवरील चार ज्येष्ठांचा तर ५०‎ वर्षे विवाहाला पूर्ण केलेल्या आठ‎ जाेडप्यांचा सत्कार करण्यात आला.‎ प्रमुख पाहूणे म्हणून आमदार सीमा हिरे,‎ यशवंत पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे‎ अध्यक्ष विठ्ठल देवरे, माजी नगरसेवक‎ प्रवीण तिदमे, कैलास चुंभळे आदी‎ उपस्थित हाेते. कार्यक्रमादरम्यान अनेक‎ ज्येष्ठांनी नृत्य करत कार्यक्रमांचा आनंद‎ लुटला. संगीताच्या कार्यक्रमाने या‎ साेहळ्याची रंगत अधिकच वाढली.‎ स्पर्धेमध्ये विविध पारिताेषिक पटकावणाऱ्या‎ ज्येष्ठांचाही सत्कार करण्यात आला.‎ कार्यक्रमास माेठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक‎ उपस्थित हाेते.‎ ज्येष्ठ नागरिकांनी‎ उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी‎ मार्गदर्शन करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...