आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:संतकृपा संघातर्फे ज्येष्ठांचा सत्कार‎

नाशिक‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक संतकृपा ज्येष्ठ नागरिक‎ संघाचा १९ वा वर्धापन दिन‎ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात‎ आला. ८० वर्षांवरील ज्येष्ठांचा‎ मान्यवरांच्या उपस्थित यथोचित‎ गौरव करण्यात आला.‎ आडगाव नाक्यावरील संत‎ जनार्दन स्वामीनगरमधील हनुमान‎ मंदिर सभागृहात झालेल्या‎ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून‎ रुची कुंभारकर, अंबादास खैरे,‎ शंतनु शिंदे, रंजनभाई शहा,‎ सचिन मारके उपस्थित होते.‎ कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डी‎ के. गोसावी यांनी केले. यावेळी‎ तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य‎‎‎‎‎‎‎‎ तपासणी शिबिर घेण्यात आले.‎ याचा लाभ शेकडो ज्येष्ठांनी‎ घेतला.

वर्धापन दिन यशस्वी‎ होण्यासाठी संतकृपा ज्येष्ठ‎ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंतराव‎ पुंड, निर्मला देवरे, छबुलाल‎ खैरनार, मच्छिंद्र भारती, शिवाजी‎ जाधव, दिनकर खैरनार,‎ बाळासाहेब पवार, जगन्नाथ‎ सूर्यवंशी, मधुकर सोनवणे,‎ ज्ञानेश्वर निकम, कल्पना खैरनार,‎‎‎‎‎‎‎‎ रंजनाताई ढोले, वैशाली भामरे,‎ गीतांजली गोसावी यांनी परिश्रम‎ घेतले. मधुकर सोनवणे, मच्छिंद्र‎ भारती, सदाशिव पाटील,‎ सांडूगिरी गोसावी, गोपीनाथ‎ भडके, अशोक गोडसे, रत्नाकर‎ जोशी, गोपाळ किणगे, पंढरीनाथ‎ खैरनार, पोपटराव जगझाप,‎ केशव नवले, सुरेश दुसाने या‎ ज्येष्ठांचा सत्कार करण्यात‎ आला.‎

बातम्या आणखी आहेत...