आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुपीठातील शिलापूजन सोहळा:नेपाळसह परदेशातून येणार सेवेकरी; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

21 जून रोजी त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात सद्गुरु मोरेदादा रुग्णालयाच्या शिलापूजन सोहळ्यात देशभरातून महिला पुरुष सेवेकरी येणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थितीत राहणार आहे त्यासह नेपाळसह अमेरिका, दुबई, ओमान, इंग्लंड, अबुधाबी अशा अनेक देशांमधूनही सेवेकरी मोठया प्रमाणात याप्रसंगी येणार असल्याची माहिती श्री. स्वामी समर्थ सेवा मार्गाचे देश विदेश अभियान प्रमुख नितीन मोरे यांनी दिली.

नितीन मोरे यांनी नुकताच नेपाळ दौरा केला. नेपाळ मध्ये सेवा मार्गाच्या कार्यास उत्तम प्रतिसाद लाभत असून तीन दिवसांच्या तेथील विविध कार्यक्रमात दहा हजार पेक्षा अधिक सेवेकर्यानी हजेरी लावली. गुरुपीठातील कार्यक्रमाची वेगाने तयारी सुरु आहे. अमित शाह यांचे दिल्ली कार्यालयातील संबंधित अधिकारी गुरुपीठ प्रतिनिधिं च्या संपर्कात असून, केंद्रीय व स्थानिक प्रशासकीय तसेच सुरक्षा यंत्रणाही प्रत्यक्षात कार्यक्रम स्थळी वेगवेगळ्या तयारीचा आढावा घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून आढवा

जिल्हाधिकारी डी गंगाधरन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांनीही भेट देऊन गुरुपीठ वर आढावा घेतला.

मुख्य कार्यक्रमाचे व्यासपीठ, मंडप, शामियाना, बैठक व्यवस्था, वाहतूक, पार्किंग, मान्यवरांची व सेवेकऱ्यांची निवास व भोजन व्यवस्था आणि इतर सर्व छोटया मोठया गोष्टींबाबत प्रमुख सेवेकऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्या दृष्टीने नियोजन सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...