आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात एमबीएसाठी २५ मार्चला घेण्यात आलेल्या सीईटीत सर्व्हर डाऊनमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा २७ एप्रिलला घेतली जाणार आहे. त्यासाठी गुरुवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून ११ एप्रिलपर्यंत त्याची मुदत आहे. अडीच तासांच्या सीईटीत अनेक वेळा सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांचा ४० ते ५० मिनिटांचा वेळ वाया गेल्याने गोंधळ उडाला होता. विद्यार्थी- पालकांनी केंद्रावर आंदोलन केले होते. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी तक्रार देत विद्यार्थ्यांना न्याय देण्याची विनंती केली होती. पाटील यांच्या आदेशानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केली होती. मात्र, या सर्व्हर डाऊनचा त्यांना चांगलाच फटका बसल्याचे पाहायला मिळाले.
पाठपुराव्याला यश विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी मी उच्च व शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना तत्काळ फोन करून पाठपुरावा केला. त्यांनीही लवकर निर्णय घेतला. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. - प्रा. देवयानी फरांदे, आमदार
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.