आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालय:पासपोर्ट कार्यालयातील सर्व्हर सुरू ; बुधवारी दोनशेवर लोकांची पासपोर्टची कामे

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइनद्वारे मिळालेल्या तारखेनुसार पासपोर्ट काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना मंगळवारी (दि. २२) सर्व्हर डाऊनचा फटका बसला. शहरासह संपूर्ण राज्यभरात सर्व्हर डाऊन झाल्याचे कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे २० ते २५ दिवसांपूर्वी अपॉइंटमेंट घेऊनसुद्धा नागरिकांना मंगळवारी कार्यालयात ताटकळत बसावे लागले. तर, बुधवारी (दि. २३) सर्व्हर सुरळीतपणे चालू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, बुधवारी दोनशेवर लोकांची पासपोर्टची कामे झाली.

पासपोर्ट सेवा केंद्रात दोनच खिडक्या असल्याने २० ते २५ दिवसांनंतर अपॉइंटमेंट मिळते. या तांत्रिक अडचणीमुळे ज्यांच्या पासपोर्टची प्रक्रिया मंगळवारी (दि. २२) होऊ शकली नाही, त्यांना पुन्हा १५ दिवसांनंतरची अपॉइंटमेंट मिळाली होती. तसेच, बुधवारीही सर्व्हर सुरू होणार की नाही यासंदर्भात नागरिकांमध्ये चर्चा होती. मात्र, बुधवारी सकाळपासूनच सर्व्हर सुरळीतपणे चालू होते. नाशिकरोड येथील पासपोर्ट कार्यालयात पासपोर्ट काढण्यासाठी नियोजित २८० जणांच्या अर्जावर कामे केले जातात. मात्र काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन रहात असल्याने केवळ ७० ते ८० लोकांचेच पासपोर्ट काढण्यात येत आहे. कार्यालयाकडून दीडशे ते दोनशे जणांना परत पाठवले जात आहे. दररोज सकाळी काही वेळ सर्व्हर व्यवस्थित चालते तर दुपारनंतर सर्व्हर सुरू होऊनसुद्धा तांत्रिक अडचणी येत असल्याने काम संथगतीने होत आहे.

पासपोर्ट काढण्यासाठी १५ ते २० दिवसानंतर वेळ मिळते. म्हणून बऱ्याच नागरिकांनी यासाठी कामातून सुटी घेऊन कार्यालयात हजर राहतात. मात्र, मोजक्याच लोकांच्या पासपोर्टचे काम होत असल्याने उर्वरित लोकांना नाहक फेऱ्या माराव्या लागत आहे. सर्व्हर डाऊनची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...