आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासपोर्ट कार्यालय कार्यान्‍वीत:नाशिक येथील पासपोर्ट कार्यालयातील सर्व्हर सुरू

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइनद्वारे मिळालेल्या तारखेनुसार पासपोर्ट काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना मंगळवारी सर्व्हर डाऊनचा फटका बसला. शहरासह संपूर्ण राज्यभरात सर्व्हर डाऊन झाल्याचे कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे २० ते २५ दिवसांपूर्वी अपॉइंटमेंट घेऊनसुद्धा नागरिकांना मंगळवारी कार्यालयात ताटकळत बसावे लागले. बुधवारी सर्व्हर सुरळीतपणे चालू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, बुधवारी दोनशेवर लोकांची पासपोर्टची कामे झाली. पासपोर्ट सेवा केंद्रात दोनच खिडक्या असल्याने २० ते २५ दिवसांनंतर अपॉइंटमेंट मिळते. या तांत्रिक अडचणीमुळे ज्यांच्या पासपोर्टची प्रक्रिया मंगळवारी (२२ नोव्हेंबर) होऊ शकली नाही, त्यांना पुन्हा १५ दिवसांनंतरची अपॉइंटमेंट मिळाली होती.

बातम्या आणखी आहेत...