आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेतू अध्ययन उपक्रम:सेतू अध्ययन उपक्रम लवकरच; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी उपाय

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी आता सर्व महाविद्यालयांत सेतू अध्ययन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये हा उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबत विद्यार्थ्यांसाठी सेतू अध्ययन उपक्रम सुरू केला आहे. ऑनलाइन पद्धतीने अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये शिक्षणाचा अपेक्षित दर्जा राखता येण्यामध्ये काही मर्यादा आल्या असल्याचे निरीक्षण नोंदविले असून विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययननिष्पत्ती साध्य झाली नसल्याचे दिसून आले आहे. तसेच या घटकांसाठी अधिक अध्यापनाची आवश्यकता असल्याचे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी नमूद केले. ही बाब लक्षात घेऊन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमधील उणीव दूर करण्यासाठी, शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ब्रीज कोर्स असावा अशी आवश्यकता सर्वच कुलगुरूंनी व्यक्त केली.

काही विद्यापीठांनी याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. तथापि, सर्व विद्यापीठांमध्ये समान कार्यपद्धती असावी या दृष्टीने संचालक, उच्चशिक्षण संचालनालय यांना कोविड-१९ कालावधीमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता सेतू अध्ययन उपक्रम राबविण्यासंदर्भातचा प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबत बैठकीत निर्देश देण्यात आले होते. त्यास अनुसरून प्रस्ताव सादर केला असून त्या अनुषंगाने राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतर्फे तातडीने सेतू अध्ययन उपक्रम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...