आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जासाठी मुदत:परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी सात अर्ज; आज अंतिम संधी

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेअंतर्गत २०२२ व २०२३ या वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले जात असून इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ५ ऑगस्टपर्यंत अर्जासाठी मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत नाशिक विभागात सात विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

अर्जाची प्रत व आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती संबंधित विभागीय कार्यालयास मूळ कागदपत्रांवरून पडताळणी करून सादर करण्याची मुदत ८ ऑगस्टपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी, THE (Times Higher Education) / किंवा QS (Quacquarelli Symonds) Ranking २०० च्या आत असलेल्या संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल, अशा विद्यार्थ्यांकरिता ही शिष्यवृत्ती दिली जाते. इच्छुक उमेदवारांनी​​​​​​www.foreignscholarship2022.dtemaharashtra.gov.in येथे अर्ज भरावा, अधिक माहितीसाठी समन्वयक जयंत जोशी ७८७५२७६१३६ यांच्याशी संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...