आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात आणखी दोन दिवस कडाक्याची थंडी:निफाडमध्ये निचांकी तापमान 8.1; धुळे 8.2, तर नाशिकचा पारा 10.4 अंशावर

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीर आणि लडाख परिसरात हिमवृष्टी होत असल्याने उत्तरेतील राज्यांसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाची घसरण होऊन सकाळचे तापमान हे १० अंश सेल्सियसवर आले आहे. राज्यात आणखी दोन दिवस कडाक्याची थंडी राहणार आहे.ओझर येथे राज्यातील नीचांकी ७.५, निफाड ८.१, धुळे ८.२, तर नाशिक येथे १०.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर उर्वरित राज्यामध्ये आकाश स्वच्छ व निरभ्र असून त्या ठिकाणीही किमान व कमाल तापमानात घसरण झाली आहे. मात्र महाराष्ट्र नाशिक आणि धुळे जिल्ह्यात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. दोन दिवसानंतर थंडी काहीशी कमी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...