आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक काहीकाळ ठप्प:नाल्याचा गाळ रस्त्यावर; देवळालीत प्रचंड दुर्गंधी

देवळाली कॅम्प3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळालीत सोमवारी सकाळी लामरोड ते रेस्ट कॅम्परोडवर एका खासगी डंपरमधून नालीचा गाळ रस्त्यावर पडल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाला कळवले असता आरोग्य विभागाकडून स्वच्छता करत वाहतूक सुरळीत करण्यात आली.

डंपरमधून गाळ रस्त्यावर पडल्याने नागरिकांना नाक मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागले. अशा वाहनचालकांवर कारवाईची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. तर क्षमतेपेक्षा अधिक गाळ वाहतूक करणाऱ्या डंपरमधून रस्त्यावर गाळ पडल्याने प्रचंड दुर्गंधी आणि वाहतुकीची समस्या उद्भवल्याचे वंचित आघाडीचे शहराध्यक्ष लखन डांगळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...