आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:नाल्यामुळे दुर्गंधी, रहिवासी त्रस्त; नाला बंदिस्त करण्याची नागरिकांची मागणी

इंदिरानगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मानस व अरुणोदय सोसायटीजवळून वाहत असलेला नैसर्गिक नाला उघडा असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. दहा वर्षांपासून दुर्गंधीचा हा त्रास येथील रहिवासी सहन करत आहेत. यामुळे लहान मुलांना ताप येत आहे. साथीचे आजार होण्याची दाट शक्यता आहे.राजीवनगर, पेठेनगरच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या नाल्यात काही बंगले व सोसायटीधारकांनी गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी जोडले आहे. याच नाल्यात कचरा टाकत असल्याने डास वाढले आहे.

याबाबत वारंवार लेखी तक्रारी करूनही याकडे मनपाचा संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे. या नाल्यावर काहींनी अतिक्रमण केल्यामुळे नाला स्वच्छ करता येत नाही. नाला बंदिस्त होईपर्यंत नाल्यावर जाळीचे झाकण लावावे, डास प्रतिबंधक औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दुर्गंधीमुळे रहिवासी हैराण
नाल्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त असून नाला बंदिस्त होत नाही तोपर्यंत प्रतिबंधक उपाय याेजावेत. - अॅड. आनंद खैरनार, रहिवासी

प्रतिकूल शेऱ्याने अडथळा
नगररचनाकडून प्रतिकूल शेरा आल्याने व मनपात प्रशासकीय राजवटीमुळे नाला बंदिस्तचा विषय रेंगाळला.-सतीश साेनवणे, माजी सभागृहनेता

..तर काेण जबाबदार
पालिकेच्या संबंधित विभागाने पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा. डेंग्यूने जर जीवितहानी झाली तर कोणाला जबाबदार धरायचे?- विलास बोराडे, रहिवासी

कचरा टाकणाऱ्यांना दंड करा
या नाल्यात कचरा टाकणाऱ्यांना दंड आकारण्यात यावा. कचरा टाकल्याने नाल्यात पाणी तंुबते तसेच दुर्गंधीत वाढ हाेते. यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. - महेश थोरात, रहिवासी

दुर्गंधीसह डासांची माेठी समस्या
दहा वर्षांपासूनचा प्रश्न भेडसावत असून नाल्याच्या दुर्गंधीने व डासांनी हैराण झालो आहोत. पाठपुरावा करत असल्याने अर्धा अधिक नाला झाला आहे. - एस. सी. पाटील, चेअरमन, देवदत्त सॊसायटी

बातम्या आणखी आहेत...