आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:आरटीओ परिसरातील दुर्गानगर भागातील रस्त्यावर सांडपाणी; माेकाट कुत्र्यांचा उच्छाद

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेठरोडवरील आरटीआे परिसरातील दुर्गानगर भागात मोकाट कुत्रे, अस्वच्छता आणि सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने रहिवाशांचे आराेग्य धाेक्यात आले असून मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुलांसह वाहनधारकांना जीव मुठीत धरून यावे-जावे लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने तातडीने रस्त्यावर येणारे सांडपाणी बंद करून कुत्रे पकडून न्यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

आरटीओ ऑफिसच्या बाजूचा परिसर विविध समस्यांनी ग्रस्त असून, आजी-माजी नगरसेवकांकडून कायमच याकडे दुर्लक्ष केलेले आहे. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी समस्यांबाबत कळवूनही त्याकडे डाेळेझाक करतात. एकाच गल्लीत २० भटकी कुत्री फिरत असून सोसायटीतील एक कुटुंब या भटक्या कुत्र्यांना दूध, बिस्किटे रस्त्यावरच खाऊ घालते.

त्यामुळे कुत्रे रात्रंदिवस येथेच घोटाळत असतात. पादचाऱ्यांना, वाहनधारकांना तसेच लहान मुले, महिला आणि वृद्ध यांच्यावर हे कुत्रे धावून जात असल्याच्या घटना येथे घडत आहेत. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि त्यांना रस्त्यावर खाऊ घालणाऱ्यांना ही समज द्यावी. आरटीओ ऑफिसकडून धारीवाल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेजारील सोसायटीतील काही रहिवासी महिला शिळे अन्न टाकत असल्याने दुर्गंधी पसरलेली असते. रस्त्याच्या कडेलाच कचऱ्याचे ढीग पडलेले असतात. घंटागाडीही नियमित आणि वेळेत येत नाही.

दुर्गानगरातील रहिवाशांचे आराेग्य धाेक्यात
दुर्गानगर भागात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे.दुर्गानगर भागात सर्वात माेठी समस्या भटक्या कुत्र्यांची असून दररराेज एक-दाेन घटना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घडत आहेत. या कुत्र्यांमुळे रहिवाशांच्या जीवच धाेक्यात आला असून कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे व स्वच्छता माेहीम राबविणे आवश्यक आहे. - डॉ. गणेश शिंदे, रहिवासी

बातम्या आणखी आहेत...