आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही लोकांकडून शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार बाजूला सारत, आरक्षण संपविण्याचा घाट घातला जात आहे. असा गंभीर आरोप अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. उज्वला गॅस, प्रंतप्रधान आवास योजनेसाठी तोच इंपिरिकल डाटा वापरला जात आहे. मात्र राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी इंपिरिकल डाटामध्ये तृटी दाखवली जाते. भाजपशासित राज्यांना एक आणि बिगर भाजपशासित राज्यांना एक न्याय अशी भूमिका केंद्र सरकारची आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. भुजबळ सावित्रीबाई फुले शाळेच्या नूतन इमारतीच्या उदघाटन समारंभात नाशिक येथे बोलत होते.
नेमके काय म्हणाले छगन भुजबळ?
शरद पवारांनी पुढाकार घेत मंडल आयोग स्थापन केला, 27 वर्षांपूर्वी मिळालेले आरक्षण संपविण्याचा घाट काही लोकाकडून रचला जातोय. आरक्षणामुळे अनेक विद्यार्थी उच्चपदावर गेले आहेत, जसे शिक्षणात पुढे जायला हवे तसेच ओबीसींनी राजकारणात पुढे जायला हवे असे मत भुजबळांनी व्यक्त केले आहे. तर आज आरक्षणावर गदा आली आहे असेही त्यांनी म्हटले आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उभा राहत असताना ओबीसींची जनगणना करण्याची मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे केली होती. यासाठी जवळपास 100 खासदारांचा गट निर्माण झाला होता. ही जनगणना झालीही मात्र अद्यापही ही जनगणना जाहीर करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खोट बोल पण रेटून बोल अशी वृत्ती आहे. त्यांच्या कालावधीत आरक्षण धोक्यात येत असतांना वेळेवर केंद्राकडे मागणी केली मात्र तरीही त्यांना माहिती मिळाली नाही. इंपिरिकल डेटा ही राष्ट्राची संपत्ती आहे ती प्रत्येक राज्याला देण्यात यावी यासाठी अशी मागणी सुप्रीम कोर्टात केली होती. मात्र हा डेटा ओबीसींचा नाही असे सांगण्यात आले. ओबीसींचा डेटा होता म्हणूनच फडणवीस यांनी मागतीला होता मग तरी देखील फडणवीस यांना का दिला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.