आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडथळा:शालिमारला अतिक्रमणांचा विळखा; रिक्षाचालक, विक्रेत्यांमुळे अडथळा

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिक्रमण विभागाकडून शहरातील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याचे काम मागील काही महिन्यांपासून थांबविण्यात आल्याने शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शालिमार चौकात मात्र अनधिकृत अतिक्रमणाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.

शालिमारहून नाशिकरोड रेल्वेस्टेशन, देवळाली कॅम्प व भगूरला जाण्यासाठी येथून दिवसभर बसेस असतात. शालिमारपासून जवळच्याच अंतरावर अनेक शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा व दवाखाने असल्याने येथे दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याभोवती असलेल्या कारंजाचेही विद्रुपीकरण या अतिक्रमणामुळे होत आहे.

पंजाबी ड्रेस, चप्पल-बूट, घरगुती उपकरणे, बेशिस्त रिक्षाचालक अशाप्रकारच्या अनधिकृत अतिक्रमणांमुळे पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनचालकांना याचा त्रास होत आहे. दरम्यान, सायंकाळच्या वेळेस येथे मोबाइल व रोकड रक्कम हिसकावणे असे प्रकार घडत आहेत. रिक्षाचालकांकडून अनेकदा प्रवाशांना अरेरावी केली जाते. सदर प्रकार थांबवून बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लावावी, अशी मागणी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...