आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती संभाजीराजे:धर्म, स्वराज्यरक्षणासाठी लढले शंभूराजे : वाटपाडे ; संभाजीराजे कधीही कोणापुढे झुकले नाही

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीराजे कधीही कोणापुढे झुकले नाही. शत्रूंनाही धडकी भरायची. माती, धर्म आणि स्वराज्यरक्षणासाठी लढणारे असे शंभूराजे होते, असे प्रतिपादन शिवचरित्रकार सोपान वाटपाडे यांनी केले.

गोदाघाटावरील य. म. पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेतील वाटपाडे यांनी स्व. पंडितराव खैरे स्मृती व्याख्यानात ‘छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर (दि. १४) वे पुष्प त्यांनी गुंफले. ते म्हणाले की, आयुष्यात संकटांचा सामना करावा लागणार असल्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजे यांना कल्पना दिली होती. दगडाला ठोकर मारून यशस्वी झालेले संभाजी महाराज होते. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत, संकटांवर यशस्वीपणे लढाई करून मात करत, संकटे म्हणजे काय असतात ते संभाजी महाराज यांच्याकडे बघितल्यास समजते. आग्र्याला कैदेत असताना संभाजी महाराज डगमगले नव्हते. त्यांचा स्वाभिमान त्या घटनेत बघायला मिळत असल्याचे वाटपाडे यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...