आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महात्मा फुलेंकडून स्वप्नांना आकार‎; शाळा इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी खासदार गाेडसेंचे प्रतिपादन‎

नाशिकरोड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक‎ वंचितांना ज्ञानाचा परिस स्पर्श देत ‎भविष्यातील स्वप्नांना आकार‎ देण्याचे कार्य महात्मा फुले यांनी‎ केले. हेच काम आणि विचार‎ महात्मा फुले समाज शिक्षण संस्था ‎करीत असल्याचे प्रतिपादन खासदार ‎हेमंत गोडसे यांनी केले.‎ पखाल रोडवरील महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेच्या नवीन ‎इमारतीचे भूमिपूजन खासदार गाेडसे ‎ यांच्या हस्ते करण्यात आले.‎ हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड‎ कंपनीच्या सी.एस.आर फंडातून‎ इमारतीचे काम करण्यात येत आहे.‎

‎भाऊराव बच्छाव, एचएलचे जनरल‎ मॅनेजर साकेत चतुर्वेदी, सुब्रत‎ मंडळ, रामकृष्ण साहू, संदीप राघव,‎अरुण कुमार, रंजना चौधरी, जितेंद्र‎ सोनवणे, व्ही. एस. भगत आणि‎ उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे‎ सहायक संचालक प्रकाश बच्छाव‎ उपस्थित होते. सीएसआर फंडातून‎ या संस्थेला आम्ही मदत करीत‎ असल्याचे साकेत चतुर्वेदी यांनी‎ सांगितले.‎

प्रामाणिकपणा, सचोटी, नि:स्वार्थ‎ भाव असेल तर शून्यातूनही‎ भरभराट होत असल्याचे सहाय्यक‎ संचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांनी‎ सांगितले. यावेळी डी.डी .खैरनार,‎ पुरुषोत्तम फुलसुंदर, मधुकर‎ बच्छाव, सुधाकर जाधव,‎ बाळासाहेब पुंड, सुनीता खैरनार‎ उपस्थित होते. संस्थेच्या प्रगतीसाठी‎ सामूहिक प्रयत्न गरजेचे असतात.‎ त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती साधली‎ जाईल, असे मान्यवरांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...