आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या चेहऱ्यांना संधी:नाशिक काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर यांचा राजीनामा; एक व्यक्ती, एक पद धोरणाचे पालन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या पाच वर्षांपासून नाशिक शहर काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी प्रभारी असलेल्या शरद आहेर यांनी अखेर एक पद एक व्यक्ती या पक्षाच्या धाेरणानुसार राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, पक्षाचे प्रदेशअध्यक्ष नाना पटाेले यांनी शिर्डीत सुरू असलेल्या नवसंकल्प अधिवेशानतच आहेर यांच्या राजीनाम्याची घाेषणा करीत या जागेवर लवकरच नव्या व तरूण चेहऱ्याला संधी दिली जाणार असल्याचे सांगितले.

नाशिक शहर व जिल्ह्यात काॅंग्रेस पक्षाला वर्षानुवर्ष गटबाजीने पाेखरले असून गत दहा वर्षांपासून पक्षाला पूर्णवेळ शहराध्यक्षपद मिळाला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली अहे. पक्षाला एकप्रकारे मरगळ आलेली असून पक्षात चैतन्य निर्माण हाेण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांकडूनच पूर्णवेळ शहराध्यक्षपदाची मागणी केली जात हाेती. यामध्ये विद्यमान शहराध्यक्ष असलेले शरद आहेर यांची वर्षभरापूर्वीच पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली हाेती. त्यानंतरही नूतन शहराध्यक्षची निवड न करता प्रभारीपदी आहेर यांच्याकडेच पदभार साेपविण्यात आला हाेता. यामुळे पक्षातील इतर इच्छूकांच्या नाराजीत भर पडली.

नुकत्याच उदयपूर येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत संघटना बळकटीसाठी एक व्यक्ती एक पद हे धाेरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पातळीवर शिर्डी येथे पक्षाचे दाेन दिवशीय नवसंकल्प शिबिर आयोजित केले असून त्याच शिबिराच्या सुरुवातीला शरद यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. प्रदेशाअध्यक्ष यांनी जाहीरपणे ताे मंजूर केल्याचे सांगितले.

इच्छुकांची माेर्चेबांधणी

काॅंग्रेस शहराध्यक्षपदासाठी नगरसेवक पदाचा राजीनाम देऊन पक्षप्रवेश केलेल्या माजी नगरसेवक गुरुमीत बग्गा यांच्या नावाला पक्षातूनच विराेध झाल्याने त्यांनी प्रवेशानंतर काही महिन्यातच पक्षात कुठलीही सक्रिय भूमिका न बजावल्यानेही तेही पक्षश्रेष्ठींशी नाराज असल्याचे बाेलले जात आहे. आता या पदासाठी पुन्हा माजी अध्यक्ष आकाश छाजेड, माजी मंत्री डाॅ. शाेभा बच्छाव, भारत टाकेकर, वसंत ठाकूर, राहूल दिवे, बबलू खैरे यांच्या नावाची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...