आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी धोरणांमुळे कामगार उद्धवस्त:राज्यकर्त्यांना कष्टकरी कामगारांची चिंता वाटत नाही, त्याऐवजी रामाच्या मंदिराची चिंता - शरद पवार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या अर्थकारणाला स्थैर्य देण्याचे काम कामगार करत आहेत मात्र, सरकारच्या बदलणाऱ्या धोरणांमुळे आजकाल कामगार उद्धवस्त होत असल्याचे चित्र दिसत असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

आयएसपी व सीएनपी प्रेस मजदूर संघातर्फे शनिवारी नाशिकरोडच्या प्रेस जिमखाना येथे हिंद मजदूर संघाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

काय म्हणाले पवार?

शरद पवार म्हणाले की, २५ वर्षांपूर्वी मुंबईत कष्टकरी कामगार दिसायचा. आज तो उद्धवस्त झालेला दिसतोय. त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. आजच्या राज्यकर्त्यांना कष्टकरी कामगारांची चिंता वाटत नाही. त्याऐवजी रामाच्या मंदिराची चिंता वाटते. अशी टीका शरद पवारांनी केली.

तुमच्या डोक्यावरची लाल रंगाच्या टोप्या एकजूट, संघर्षाची एकजूट दर्शवते. आज मात्र, भगवी टोपी घालून मिरवणारेदेखील दिसतात, अशी कोपरखळीही शरद पवारांनी भाजपला लगावली.

केंद्राने उद्योजकांच्या दबावाखाली येऊन संघर्ष करून केलेल्या कामगार हितांचे कायदे रद्द करण्यात आले आहेत. कामगारांना आठ तासापेक्षा अधिक काम देणे, हवे तेंव्हा कामावरून काढून टाकणे, असे कायदे करण्यातत आले. कामगारांना कामाची सुरक्षा राहिली नाही. कोळसा खाणी, रेल्वे गाड्या, विकासाच्या नावाखाली खासगीकरण केले जातेय. असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमावेळी समारंभाच्या व्यासपीठावर नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत टकले, हिंद मजदूर संघाचे राष्ट्रीय खजिनदार जयवंतराव भोसले, आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर जुंद्रे होते.