आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना स्थिती आढावा दौरा:आज शरद पवारांचा नाशिक दौरा, आरोग्यमंत्री राजेश टोपेही राहणार सोबत, कोरोना स्थितीचा घेणार आढावा

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दौऱ्यांचा धडाका लावला आहे. ते अख्ख्या महाराष्ट्रभर फिरत कोरोना स्थितीचा आढावा घेत आहे. आज त्यांचा नाशिक दौरा आहे. येथे कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने 10 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आता शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे नाशिकला भेट देऊन कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहे. 

नाशिक जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. यामुळे आता शरद पवार हे या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल होत आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर पवार आधी एमराल्ड पार्क या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतली. त्यानंतर दुपारी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पवार बैठक घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळही उपस्थित राहणार आहे. नाशिकातील सर्व दौरा आटोपल्यानंतर पवार औरंगाबादकडे रवाना होणार आहेत.