आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेअर्स मार्केटमध्ये 25 लाखांचा तोटा झाल्याने पाच वर्षापूर्वी ज्या बांधकाम व्यावसायिकांकडे कामास असलेल्या कामगाराने ईडीकडे तक्रार करण्याची धमकी देत तब्बल 47 लाखांचा खंडणी मागितली. व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर बुधवारी दुपारी संशयिताला सापळा रचून अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने सुयोजित मॉर्डन पॉईंट शरणपुररोड येथे ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि बांधकाम व्यावसायिक समीर सोनवणे रा. महात्मा नगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पाच वर्षापूर्वी कार्यालयात संशयित मारोती रमेश खोसरे रा. धृवनगर शिवाजी नगर सातपूर हा ऑफिस बॉय आणि बांधकाम साईट सुपरवायझर म्हणून कामास होता. याकाळात त्याने कार्यालयातील संगणकातून व्यवसायाचा महत्वाचा डाटा चोरी केला होता. व्यावसायिक मित्र रमाकांत डोंगरे यांना फोन करुन संशयित मारोती यांने माझ्याकडे तुमचे मित्र समीर सोनवणे यांचा महत्वाची माहिती असलेला डाटा असल्याचे सांगत सोनवणे यांच्या विरुद्ध ईडी आणि एसीबीकडे तक्रार करुन बदनामी करण्याची धमकी दिली.
47 लाखांची खंडणी
हे प्रकरण मिटवायचे असल्याने 47 लाखांची खंडणी मागितली. सोनवणे यांनी डोंगरे यांच्या मध्यस्थीने संशयिताला सोमवार दि. 25 रोजी पाच लाख रुपये दिले. संशयित रोकड घेऊन गेल्यानंतर पुन्हा फोन करुन खंडणीची उर्वरीत रक्कमेची मागणी केली. सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरिक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
असा रचला सापळा
संशयिताने सोनवणे यांच्याकडे खंडणी मागीतल्यानंतर पथकाने सोनवणे यांना संशयिताला रक्कम घेण्यासाठी यावे असा फोन केला. संशयित शरणपुररोड येथील कार्यालयात आल्यानंतर पथकाने त्याला अटक केली.
शेअर्स मार्कटमध्ये तोटा
संशयित मारोती खोसरे यास पाच वर्षापूर्वी कामावरुन काढले आहे. मधल्या काळात त्याने शेअर्स मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक केली. मात्र त्याचे 25 लाख रुपये मार्केटमध्ये बुडाल्याने त्याने चोरी केलेला डाटाच्या अधारे सोनवणे यांना ईडी आणि इतर तपास यंत्रणाकडे तक्रार करण्याची धमकी देत खंडणी मागितली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.