आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करात्र्यंबकेश्वरच्या देवगाव आश्रमशाळेतील विद्यार्थिनी ज्या दिवशी वृक्षारोपण करण्यात आले, तेव्हा गैरहजर होती. त्यामुळे तिला मासिक पाळीत झाड लावण्यास मज्जाव करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, त्यामुळे प्रकरण बनावट असल्याचा अहवालच प्रकल्पाधिकारी वर्षा मिणा यांच्या द्विसदस्यीय समितीने दिला आहे. मात्र याबाबत मी माध्यमांशी काहीही बोलणार नसून अहवाल वरिष्ठांना सादर केल्याचे मिणा यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
देवगाव आश्रमशाळेतील मासिक पाळी असताना बारावीच्या विद्यार्थिनीला वृक्षाराेपणापासून वंचित ठेवल्याचे प्रकरण गेल्या आठवड्यात चर्चेत आले हाेते. यावरून श्रमजीवी संघटनेने निषेध करत चाैकशीसह कारवाईची मागणी लावून धरली होती. त्याची आदिवासी विकास विभागाने दखल घेत प्रथम शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना चाैकशी करण्याचे आदेश दिले. त्यांनी असं काही घडलंच नसल्याचे अहवालातून कळविले. परंतु, त्यावर न थांबता प्रकल्पाधिकाऱी मिणा यांनी स्वत:सह बालहक्क आयोगाच्या सायली पालखेडकर यांना सोबत चाैकशी केली. या प्रकरणाच्या आदिवासी विकास विभाग, बालहक्क आयोग आणि महिला आयोगानेही चाैकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार या समितीने अहवाल सादर केला आहे. पुढील कार्यवाही आयुक्तालय स्तरावरून केली जाणार असल्याचे आदिवासी विकासच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
नव्या अहावालातून प्रकरण बनावट असल्याचा दावा
वर्षा मीना यांच्या द्विसदस्यीय समितीने शालेय हजेरी पुस्तक तपासले असता त्यात संबधित मुलगी वृक्षारोपणाच्या दिवशी शाळेत हजर नव्हती. ती जुलै महिन्यातही तीन दिवस तर जून महिन्यातही ४ दिवसच हजर असल्याचे या हजेरी पुस्तकातून उघड झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.