आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेखर गवळी मेमोरियल स्पर्धा:नाशिक जिमखानाने एनसीए वर 75 धावांनी मात करून पटाकवले विजेतेपद

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये रंगलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन- एन डी सी ए - व राम लखन क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित शेखर गवळी मेमोरियल टी - 20 क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात नाशिक जिमखानाने एनसीए वर 75 धावांनी मात करून विजेतेपद पटकावले.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर अंतिम सामन्यानंतर लगेचच या पहिल्या शेखर गवळी मेमोरियल टी - 20 क्रिकेट स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.

याप्रसंगी स्पर्धेच्या संकल्पनेचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार वसंतभाऊ गीते व प्रथमेश गीते यांसह विलासभाऊ लोणारी ,मीरा आजी फाउंडेशनचे अद्वैत व कृष्णा गोसावी, रंजन ठाकरे, नरेंद्र छाजेड , राजाभाऊ भागवत , दीपक चव्हाण, दीप्ती शेखर गवळी, करण लांबा, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद ( धनपाल ) शहा, पदाधिकारी, राजू आहेर, राम लखन क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष दशरथ लोखंडे, संजय परिडा , बाळासाहेब मंडलिक,गणेश गायकवाड , संदीप सेनभक्त, सर्वेश देशमुख, प्रल्हाद सूर्यवंशी , राजू गोसावी या व इतर संबंधितांची खास उपस्थिति होती. सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे यांनी केले.

विजेतेपदासाठीचे रुपये एक लाख एक हजार नाशिक जिमखानाला व उपविजेत्या एनसीए संघाला एकावन्न हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. या सांघिक पारितोषिकांबरोबरच मालिकावीर अकरा हजार यासर शेख, तर उत्कृष्ट फलंदाज श्रीकांत शेरीकर, उत्कृष्ट गोलंदाज अमित गवांदे , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विकास वाघमारे ,व उत्कृष्ट यष्टिरक्षक मोहित नेगी यांना देखील प्रत्येकी पाच हजार रुपये व चषक अशी वैयक्तिक पारितोषिके मिळाली. दरवर्षी नियमितपणे यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर शेखर गवळी मेमोरियल क्रिकेट स्पर्धा खेळवण्याचा आयोजकांचा मानस आहे.

अंतिम सामन्यात नाशिक जिमखानाने एन सी ए विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 191 धावसंख्या उभारली ती मुख्यत: श्रीकांत शेरीकरच्या फटकेबाज 88 धावांच्या जोरावर. त्यास कपिल शिरसाट 38 व विकास वाघमारे 31 यांची साथ मिळाली. एनसीए च्या कोणत्याच गोलंदाजाचा विशेष प्रभाव पडला नाही. उत्तरादाखल एन सी ए च्या डावाची 2 बाद 14 अशी खराब सुरुवात झाल्यानंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले व 17.4 षटकांत 116 धावांत त्यांचा डाव संपला. एनसीए तर्फे श्रीरंग कापसे ने सर्वाधिक 23 धावा केल्या.

बातम्या आणखी आहेत...