आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेखर गवळी मेमोरियल स्पर्धा:एन सी ए , 22 यार्डस , एन एस एफ ए व नाशिक जिमखाना उपांत्य फेरीत

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये सुरू असलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन- एन डी सी ए - व राम लखन क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित शेखर गवळी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या दिवशी एन सी ए , 22 यार्डस , एन एस एफ ए व नाशिक जिमखाना यांनी आपले उपांत्यपूर्व फेरीचे सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर पहिल्या सामन्यात अद्वैत क्रिकेट अकादमीने एन सी ए विरुद्ध प्रथम फलंदाजी करत 162 धावा केल्या. तनयकुमारने 66 व श्रीकांत सुरेन्द्रने 38 धावा केल्या. जयेश पवारने 3 गडी बाद केले. केवळ 2 चेंडू बाकी असताना एन सी एने 4 गडी राखून विजय मिळवला. त्यात अभिजीत पवारने 44 धावा केल्या तर अद्वैतच्या श्रीकांत सुरेन्द्रने 2 व अभिजीत नेहरकरने 1 गडी बाद केला. सामनावीर जयेश पवार.

दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी मिळालेल्या एन एस एफ एने जंबो विरुद्ध 153 धावा केल्या. त्यात प्रतिक देवरेने 52 व राहुल भगाडेने 35 धावा केल्या. जंबोच्या मोहन केसीने 2 गडी बाद केले. उत्तरादाखल एन एस एफ एच्या प्रतिक भालेराव ने पुनः एकदा भेदक गोलंदाजी करत 4 गडी बाद केल्याने जंबोला 90 पर्यंतच मजल मारता आली. राहुल भगाडेनेहि 2 गडी बाद केले. जंबोच्या विकास धोत्रेने 33 धावा केल्या. सामनावीर प्रतिक भालेराव.

महात्मनागर क्रिकेट मैदानावर पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी मिळालेल्या 22 यार्डसने गुरुदत्त दामलेच्या 56 व ओंकार भवरच्या 47 धावांच्या जोरावर आर टी स्पोर्ट्सविरुद्ध 173 धावा केल्या. आर टी स्पोर्ट्सच्या पियुष पवारने 3 तर शंतनूने 2 गडी बाद केले. उत्तरा दाखल आर टी स्पोर्ट्सला 130 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यात प्रशांत मोरेने 34 धावा केल्या. 22 यार्डसच्या राहुल रत्नपारखी ने 3 गडी बाद केले.

महात्मानगर क्रिकेट मैदानावर दुसऱ्या सामन्यात मेरीने नाशिक जिमखाना विरुद्ध प्रथम फलंदाजी करत 147 धावा केल्या त्यात गोपीनाथ जाधवच्या सर्वाधिक 35. नाशिक जिमखानाच्या यासर शेख , अखिलेश सिंग व तन्मय शिरोडेने प्रत्येकी 2 गडी बाद केले. उत्तरादाखल नाशिक जिमखानाच्या सलामीवीर यासर शेख नाबाद 73 व कपिल शिरसाट 71 यांच्या तडाखेबंद फलंदाजीने नाशिक जिमखानाने 9 गडी राखून विजय मिळवला. सामनावीर राहुल रत्नपारखी.

बातम्या आणखी आहेत...