आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआरतीतून गुंजणार गाेदाचे महात्म्य‎:शिखरस्वामिनी महिला संस्था, निर्मल गोदागौरवचा उपक्रम आज‎

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिखरस्वामिनी बहुउद्देशीय‎ महिला संस्था, नाशिक आणि निर्मल‎ गोदागौरव फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त‎ विद्यमाने गोदाघाटावर बुधवारी (दि. ८)‎ गोदावरीच्या भव्य महाआरतीचे आयोजन‎ करण्यात आले आहे. "निर्मल पावन विशाल‎ सुंदर आमुची गोदावरी’ हा मंजूळ सूर या‎ आरतीतून गुंजणार आहे.‎ सायंकाळी ६ वाजता हाेणार असलेल्या या‎ महाआरतीत विविध महिला संस्थांच्या‎ सदस्या मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.‎ यावेळी गोदावरी गौरव महिमा आणि जल‎ स्वच्छता यावर सुरेखा बोऱ्हाडे यांचे‎ व्याख्यान हाेईल. महाआरतीसाठी ऑल‎ इंडिया लिनेस क्लब नाशिकराेड, रणरागिनी‎ मराठा महिला मंडळ, देशमुख समाज महिला‎ मंडळ, साहित्य परिषद संस्था, नाशिकराेड‎ यांसह विविध संघटना सहभागी हाेतील.‎

बातम्या आणखी आहेत...