आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकला हवे मंत्रिपद:भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे फडणवीसांना देणार प्रस्ताव, म्हणाले- मंत्रिमंडळ विस्तारात दखल घेतली जाईल

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या इतिहासात स्पष्ट बहुमताची मिळालेली सत्ता तसेच शहरांमधून सलग दोन वेळा भाजपाचे आमदार निवडून दिल्याची नक्कीच दखल मंत्रिमंडळात विस्तारात घेतली जाईल. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव दिला जाईल असे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

बावनकुळे यांनी शहर व जिल्हा कोर कमिटीची बैठक घेत नाशिकमध्ये आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चाचपणी केली. भविष्यात नाशिकला ताकद देण्यासाठी काय काय उपाययोजना करता येईल याबाबत त्यांनी चर्चा केली. नाशिक जिल्ह्यामधून भाजपाला 2014 व 2019 या दोन्ही निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बळ मिळाले. महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता देखील आली. शहरात सलग दुसऱ्यांदा भाजपाचे आमदार निवडून येण्याची मोठी घटनाही घडली.

जाहीर भूमिका नाही

मात्र या बदल्यात भाजपाकडून नाशिकला मंत्रिपद दिले जात नसल्याबाबत बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी आगामी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नाशिकचा नक्कीच विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला स्थान द्यायचे याबाबत निर्णयाचे सर्वाधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून मी केवळ नावे सुचवणारा असल्याचे सांगत त्यांनी थेट भूमिका जाहीर केली नाही.

गोदावरी प्रकल्प फास्टट्रॅकवर

महापालिकेत भाजपाची सत्ता असताना निओ मेट्रो, आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क, गोदावरी नदी शुद्ध ठेवण्यासाठी 1800 कोटी रुपयांच्या नमामी गोदावरी अशा रखडलेल्या प्रकल्पांची माहिती या संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे माहिती देऊन हे सर्व प्रकल्प फास्टट्रॅकवर कसे आणण्यासाठी पाठपुरावा करणार असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

भाजपामध्ये संघटनात्मक फेरबदल

नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त केल्यानंतर भाजप शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष तसेच स्थानिक कार्यकारणीतील फेरबदलाकडे लक्ष लागून होते. या संदर्भात विचारले असता बावनकुळे यांनी जानेवारीअखेर संघटनात्मक निवडणुका होतील असे संकेत दिले.

कोणाला संधी मिळणार?

महिला आमदार म्हणून विचार झाल्यास देवयानी फरांदे व सीमा हिरे यांचा मंत्रिपदासाठी दावा असेल. युवा तसेच मराठा बहुजन चेहरा असा विचार केल्यास राहुल आहेर व राहुल ढिकले यांची नावे आघाडीवर आहे.

बातम्या आणखी आहेत...