आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेत फाटाफुट झाली. ते उद्धव व आदित्य ठाकरे या दाेघा पितापूत्रांची दिशाभुल करीत असून माझे डिपाॅझीट जप्त करण्याची भाषा करण्यापेक्षा राऊत यांनी माझ्यासमाेर निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान खासदार हेमंत गाेडसे यांनी आज दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात पालकमंत्री दादा भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे व खासदार गाेडसे हे तिघे गेले हाेते. त्यात गाेडसे यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून जाेरदार टिका हाेत आहे. राऊत यांनीही शुक्रवारी पत्रकार परिषद व शिवसेना कार्यालयातील मेळाव्यात गाेडसे यांच्यावर जहरी टिका केली.
काेण गाेडसे असे म्हणतही खिल्ली उडवली हाेती. तसेच त्यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीत निवडून येऊन दाखवावे. त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा वार केला हाेता. त्यावर गाेडसे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. त्यांचा चेहरा नाही तर शिवसेनेचा चेहरा हीच आमची ताकद आहे. तसेच चेहरा नाही तर काम महत्वाचे असते, असे नमूद करत राऊत यांनी कधी उद्योजक आणि शेतकºयांची बैठक घेतली का?, असा सवाल गोडसे यांनी केला.
राऊत हे बाेलका पाेपट
राऊत हे जेलमध्ये असताना महाराष्ट्रात शांतता होती. हा बोलणारा पोपट असून सकाळ झाली की आपल्या चोचीतून रोज नवीन पत्ता काढत असतो आणि त्यावर टीव टीव करताे अशा शब्दात खिल्ली उडवली. राऊत यांनी संपूर्ण शिवसेनेचे वाटोळे केले. असून एकट्या माणसामुळे शिवसेनेची वाताहात झाली. त्यांच्या या चेहºयामुळेच राजकारणाची प्रतिमा मलीन होत आहे, अशी टिका केली. तसेच, राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या सर्व खासदारांचे दोन मुद्यावर एकमत झाले होते. त्यातला एक मुद्दा म्हणजे द्रौपदी मुर्मू यांची बिनविरोध निवड करावी व दुसरा म्हणजे खा. राऊत यांना बाजुला करावे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी ते न केल्यामुळे त्याचे परिणाम आज दिसत आहेत.
शिवसेनेच्या अनेक बैठकांमध्ये आपण राऊत यांना फक्त सामनाचेच काम करू द्या, अशी मागणी उध्दव ठाकरेंकडे केली होती. महाविकास आघाडी स्थापन करून राऊत यांनीच गद्दारी केली असाही दावा केला.
शिंदे गटात सर्व आलबेल
शिंदे गटात कुरबुरी सुरू असल्याबाबत विचारले असता, भुसे, कांदे व माझ्यात पुर्ण समन्वय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून हेतूपुरस्सर काही गोष्टी पसरविल्या जात असून त्याचा शिंदे गटावर कुठलाही परिणाम होणार नाही असाही दावा केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.