आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना स्वबळावर लढणार:शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बबनराव घोलपांचे लोकसभेसाठी पदाधिकाऱ्यांना 'एकला चलो रे'चा आदेश

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर आता नवीन जुन्या शिवसैनिकांचा मेळ घालत पक्षप्रमुख उघ्दव ठाकरे यांनी संघटना बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना नाशिक जिल्हा सहसंपर्कप्रमुख पद तर माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या खांद्यावर शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली आहे. शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन शिवसेना पक्षबांधणी करतांना दिसत आहे. नुकतेच देवळाली मतदार संघाचे माजी आमदार योगेश घोलप यांनी विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्यावर शिवसेनेचे श्रेय लाटण्यावरुन भविष्यात शिवसेना ही स्वंतत्र लढणार असल्याचे सांगितले, तर दुसऱ्याच दिवशी संपर्कप्रमुख पद मिळाल्यानंतर शिर्डी दौऱ्यावर असलेल्या बबनराव घोलप यांनीही शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले.

शिवसेनेने माजी मंत्री बबनराव घोलप यांच्याकडे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पद दिल्यानंतर संघाचा पहिलाच दौरा केला. यावेळी घोलपांनी शक्तीप्रदर्शन करीत तीच शिवसेना, तोच जोश आणि तेच शिवसैनिक दाखविण्याचा प्रयत्न केला. कोकमठाण येथील 175 व्या सप्ताह्याला हजेरी लावत,ठिकठिकाणी शिवसैनिकांनी फटाके वाजवुन स्वागत केले. विद्यमान खासदार लोखंडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर शिवसैनिकच त्यांची जागा दाखविणार आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये निष्ठांवत शिवसैनिकांना न्याय दिला जाणार आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघातील गटतट ही भुमिका रहाणार नसुन लोखंडे एकटेच गेले असुन त्यांच्यासोबत एकही शिवसैनिक गेलेला नसल्याचे घोलप यांनी यावेळी सांगितले. घोलप यांच्यासोबत बैठकीला जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, रांजेद्र झावरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, सुहास वहाडणे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन कोते, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लभडे, हरिभाऊ शेळके, कमळाकर कोते, तालुकाप्रमुख संजय शिंदे, मच्छिंद्र धुमाळ, मच्छिद्र म्हस्के, विजयराव काळे, डाँ. महेश क्षीरसागर, धनंजय गाडेकर, जयंवत पवार, सचिन बडदे, निलेश धुमाळ, गणेश सोमवंशी, अशोक सातपुते, अशोक कानडे या पदाघिकऱ्यांसह शिवसैनिकांनी गर्दी केली होती.

उमेदवार हा घोलपच रहाणार

न्यायालयीन प्रक्रिया सुरु असल्याने आगामी शिवसेनाचा लोकसभेसाठी उमेदवार हा मी असेल किंवा नसेल हे माहिती नाही. मात्र उमेदवार हा घोलपच असेल असे बबनराव घोलप यांनी जाहीर करुन आगामी निवडणुकीमध्ये लढाई लोखंडे विरुध्द घोलप रहाणार असल्याचे स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...