आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:दसरा मेळाव्यासाठी शिवसेना तयारीला, शिंदे गटाला मात्र आदेशाची प्रतीक्षा

नाशिकरोड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरून शिवसेना आणि सत्ताधारी शिंदे गटात राजकारण सुरू आहे. दोघांनी त्यासाठी अर्ज केले असले तरी शिवसेनेने शक्तिप्रदर्शनासाठी तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिवसैनिक उपस्थित राहावेत यासाठी विधानसभा प्रमुखांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर शिंदे गटाला अद्याप आदेशाची प्रतीक्षा आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसची देखील अप्रत्यक्षात मदत होणार आहे, तर शिंदे गटासाठी भाजप व मनसेची मदत होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातून शिंदे गटाच्या शक्तिप्रदर्शनाची जबाबदारी कॅबिनेट मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे यांच्यावर राहण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेकडून माजी समाजकल्याण व शिर्डी लोकसभा मतदार संपर्कप्रमुख मंत्री बबन घोलप, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शहरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते यांच्यासह प्रत्येक विधानसभा प्रमुखावर जबाबदारी राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...