आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामोर्चासाठी शिवसेनेची रणनीती:शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बाेलावली बैठक, नगरसेवकांनी फिरवली पाठ

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि.17) मुंबईत महामाेर्चाचे आयाेजन केले आहे. या माेर्चासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभुमीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाशिक लाेकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसाठी आायाेजित केलेल्या तातडीच्या बैठकीकडे नगरसेवकांसह जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी पाठ फिरवल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये घालमेल सुरू झाली आहे.

देशात बेराेजगारांची संख्या व महागाई वाढत चालली आहे. भाजपच्या काळातच माेठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बाेकाळला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना कवडीमाेल किंमत मिळत आहे. मात्र या बाबी दुर्लक्षीत व्हाव्यात यासाठी भाजपचे मंत्री व पदाधिकारी महापुरूषांचा अवमान करण्याची खेळी ‌खेळत असून यात सर्वसामान्य भरडले जात आहे. भाजपचा हा डाव उधळण्यासाठी शनिवारी मुंबईतून निघणाऱ्या मेळाव्यात नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिकांनी माेठ्या संख्येने सहभागी हाेण्याची सूचना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आली.

मुंबईतील भायखळा येथून राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसने आाझाद मैदानापर्यंत माेर्चाचे आयाेजन केले आहे. या मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुढाकार घेतला असल्याने शिवसैनिकांवरील जबाबदारी वाढली आहे. या पार्श्वभुमीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाशिक लाेकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बैठकीचे आयाेजन केले हाेते. शहरासह प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांना घेऊन मुंबईतील माेर्चा यशस्वी करण्याचे आवाहन शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल, दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी महापाैर वसंत गिते, विनायक पांडे, शिवसेना गटनेते विलास शिंदे आदींनी केले.

नाशिक लोकसभा मतदार संघातील सर्व आजी, माजी, शिवसेना पदाधिकारी, नगर सेवक, लोकप्रतिनीधी, उप महानगरप्रमुख, संघटक, समन्वयक, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, युवासेना, पदाधिकारी, भारतीय विद्यार्थी सेना, महिला आघाडी पदाधिकारी, ग्रामीण भागातील तालुका प्रमुख,उप तालुका प्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, गट प्रमुख, गण प्रमुख तसेच जि,प. सदस्य,पं.स. सदस्य, इतर सर्व शहर, ग्रामिण भागातील अंगीकृत संघटना पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शालिमार चौक नाशिक येथे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...