आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत विश्व मार्गदर्शक होवो, असे साकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी ही प्रार्थना केली.
त्र्यंबकेश्वरला अभिषेक
नुतन वर्षी प्रथेप्रमाणे आद्य ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वर दर्शनासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान त्यांची पत्नी, मुले कार्तिकेय व करण यांच्यासह त्यांनी त्रंबकेश्वरास अभिषेक पूजा केली. या वेळी गायधनी बंधु वाडेकर, यांच्यासह धारणे यांनी पौरोहित्य केले.
अर्थव्यवस्था झपाट्याने वाढतेय
भारत देश विश्व मार्गदर्शक होवो. भौतीक व आध्यात्मिक दृष्ट्या भारत बलशाली असुन भारतीय जनता सुख व समृद्धी होवो अशी त्रंबकेश्वर चरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भारत देशाची अर्थव्यवस्था मी मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत असून एका मजबूत ठिकाणी पोहोचली आहे.
बलशाही देश पुढे येत आहे
या अर्थव्यवस्थेमुळे भारत देश हा जगातील सर्वात बलशाही देश महान पुढे येत आहे. भविष्यात आपला भारत देशा जगाचा मार्गदर्शक ठरेल आणि तो ठरावा यासाठी परमेश्वराकडे मागणे मागितल्याचे चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरवर्षी वारी
विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण व त्यांच्या कुटुंबीयांकडून गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या दिवशी शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेऊन व तेथून त्रंबकेश्वर येथे ज्योति्लिंगांचे दर्शन घेऊन ते मध्यप्रदेशकडे परतात. त्यांची ही प्रथा कधीही खंडित होऊ दिली नाही. त्रंबकेश्वर देवस्थान चे विश्वस्त प्रशांत गायधनी, संतोष कदम व पंकज धारणे यांनी कोठी हाती मध्ये या सर्वांचा श्रींची प्रतिमा व शाल देउन सत्कार केला. यावेळी स्थानिक भाजप पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आली होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.