आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील घरगुती, व्यापारी, शेतकरी, औद्योगिक व अन्य सर्व २.८७ कोटी ग्राहकांवर जुलै २०२२मध्ये मिळालेल्या बिलापासून पाच महिन्यांसाठी इंधन समायोजन आकार या नावाखाली वीज आकाराच्या २० टक्के दरवाढ लागू करण्यात आली. याशिवाय थकीत इंधन समायोजन आकार १२२६ कोटी रुपये, खासगी वीज कंपनीचे थकीत देणे ७७०९ कोटी रुपये व समान करार असलेल्या रतन इंडियाचे देणे हा बोजा डिसेंबर २०२२ पासून लागू होण्याची दाट शक्यता असल्याकडे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी लक्ष वेधले आहे.
महावितरण सप्टेंबर २०२२ नंतर मध्यावधी फेरआढावा याचिका दाखल करणार हे निश्चित आहे. याचिकेद्वारे २ वर्षांचा कोरोनाकाळातील घाटा व खर्चातील वाढ या नावाखाली २० हजार कोटीची वाढ मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी आजच जागरूकतेने या दरवाढीस विरोध करणे व शासनाने हस्तक्षेप करावा, यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे. यासाठी राज्य समन्वय समितीने ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या काळात जिल्हा, विभाग व तालुकास्तरावर आंदोलन जाहीर केल्याचे हाेगाडे यांनी सांगितले. कोणत्याही वर्गातील ग्राहकांना इंधन समायोजन दरवाढीचा झटका सहन करण्यापलिकडचा असल्याचे ते म्हणाले.
सरासरी १.३५ रुपये प्रति युनिटने महागणार
मार्च ते एप्रिलसाठीचा किमान इंधन समायोजन आकार ५ पैसे प्रति युनिट, तर कमाल २५ पैसे प्रति युनिट इतका होता. पाच श्रेणींचा विचार केल्यास सरासरी दर हा १७ पैसे प्रति युनिट होता. मात्र हाच दर आता जुलै ते ऑक्टोबरदरम्यान येणाऱ्या वीज देयकासाठी सरासरी १.३५ रुपये प्रति युनिट झाला आहे. यानुसार आता प्रत्येक घरगुती ग्राहकाचे देयक ऑक्टोबरपर्यंत सरासरी १.३५ रुपये प्रति युनिटने महागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.