आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्याचा प्रश्न:श्रमिकनगरला चेंबर फुटल्याने‎ प्रचंड दुर्गंधी; तक्रारीकडे दुर्लक्ष‎

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर,‎ श्रमिकनगर व राधाकृष्णनगर भागातील‎ ड्रेनेजलाइनवरील चेंबर रस्त्यात दाबले‎ जाऊन फुटल्याने या परिसरात प्रचंड‎ दुर्गंधी पसरली आहे. सांडपाणी‎ रस्त्यावर येत असल्याने व्यापाऱ्यांसह‎ नागरिक हैराण झाले आहेत. मात्र या‎ तक्रारीकडे महापालिकेचे दुर्लक्ष‎ असल्याचा आराेप परिसरातील‎ नागरिकांनी केला आहे. रस्ता दुरुस्ती‎ कामात डांबरावर डांबर आेतून रस्ते‎ केले जातात. त्यामुळे रस्त्याची उंची‎ वाढते. परंतु रस्त्याच्या कामांसोबत‎ काँक्रीटचे ब्लॉक, काही ठिकाणी‎ सिमेंट ओटे नागरिकांनी केले‎ असल्याने त्या ही ड्रेनेजलाइन खाली‎ गेल्याने तीची दुरवस्था झाली आहे.‎ रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने‎ दुर्गंधी पसरत आरोग्याचा प्रश्न निर्माण‎ होत आहे. ड्रेनेज लाईन दुरुस्तीसाठी‎ निवेदन देऊनही योग्य दुरुस्ती होत‎ नाही. त्वरित दुरुस्ती करावी अशी‎ मागणी सामाजिक कार्यकर्ते कल्पेश‎ कांडेकर यांच्यासह नागरिकांनी केली‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...