आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांपासूनची परंपरा!:गांधीनगरमध्ये श्रीजगतधात्री देवी पूजन उत्सव थाटामाटात साजरा; कोविडनंतर उत्साहपूर्ण वातावरण

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पुणे महामार्गावरील गांधीनगर येथील रामलीला मैदानावर श्रीजगतधात्री देवी पूजन उत्सव सोहळा थाटामाटात साजरा झाला. विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होऊन दुपारी महाप्रसाद, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

साधारण 15 वर्षांपासून येथे श्रीजगतधात्री देवीची मनोभावे आराधना केली जाते. कोरोनामुळे दोन वर्षांपासून निर्बंधनुसार कार्यक्रम खंडीत झाले होते. मात्र, यावर्षी उत्साहपूर्ण वातावरणात धार्मिकविधी करण्यात आले.

देवीची मनोभावे आराधना

शंखध्वनी, ढोल वादन, पवित्र मंत्रोच्चारात देवीची मनोभावे पुष्पांजली वाहून आराधना करण्यात आली. श्रीजगतधात्री देवी श्रीदुर्गा मातेचे प्रतिरूप आहे. सिंहावर स्वार श्रीदेवीची मूर्ती भव्य स्वरूपात सजवण्यात आली होती. फुलमाळ, धूप, दीप, सुवासिक अगरबत्ती प्रज्वलित करून श्रीजगतधात्री देवीची महाआरती करण्यात आली. चैतन्यमय वातावरणात सकाळ पासूनच धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. श्रीजगतधात्री देवीला नैवैद्य अर्पण करून महाप्रसाद वाटप करण्यात आला. पौराहीत्य श्री अमिताभ मुखोपाध्याय यांनी केले.

महाप्रसादाचा घेतला लाभ

श्रीजगतधात्री देवी संपूर्ण विश्वाची रक्षिका समजली जाते. सिंहवाहिनी, चतुर्भुजा, त्रिनेत्रा, रक्तंबरा अशी श्रीजगतधात्री देवीची रूपे आहेत. पश्चिमबंगाल मध्ये दहा दिवस हा सण अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होतो. कार्तिक शुक्ल पक्ष नवमी मध्ये श्रीजगतधात्री देवी पूजन विधान आहे. त्यानुसार गांधीनगर येथे श्रीश्री जय जगतधात्री देवी पूजा बहुउद्देशिय संस्थेतर्फे नियमित हा धार्मिक उपक्रम साजरा होतो. मंत्र पुष्पांजली, होमहवन, पूजाअर्चना करण्यात आली. सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. लहान मुलांमुलींचे नृत्यस्पर्धा, गीतगायन स्पर्धा झाल्या. यावेळी असंख्य देवीभक्तांनी मनोभावे पूजन करून दुपारी महाप्रसादाचा लाभ घेतला.

दुसऱ्या दिवशी विसर्जन विधी

युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे (सर) यांनी देवी चरणी मनोभावे प्रार्थना केली. सर्वश्री दुर्गाचरण डे, शंकर डे, हरीश परदेशी, सुब्रतो मुखर्जी, आशिष गांगुली, देबोरंजन हरी, कृष्णा डे, दिपंकर डे, गणेश दास, सुनील मोदीयानी, साहिल शर्मा, गौतम रॉय, गुड्डू परदेशी, तुल्लिका डे दत्ता, रिमा मल्लिक, कावेरी मुखर्जी, निला गांगुली, चैताली मुखर्जी, कृष्णा बसू आदींनी परिश्रम घेतले. दुसऱ्या दिवशी विसर्जन विधी करण्यात येणार आहे.

उत्सवाला पश्चिमबंगालमध्ये सुरुवात

श्रीजगतधात्री देवीच्या पूजन उत्सवाला पश्चिमबंगाल मध्ये सुरुवात झाली. नाशिक मध्ये परंपरा जोपासली जाते, हे कौतुकास्पद आहे. श्रीजगतधात्री देवी श्रीसिध्दीधात्री देवीचा अवतार आहे. असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक म्हणून पूजन केले जाते. संपूर्ण विश्वाचे कल्याण होऊन सर्वांना सुखसमृध्दी लाभो, अशी मंगलकामना श्रीजगतधात्री देवीच्या चरणी अर्पण करू यात.

-सुषमा रवी पगारे, माजी नगरसेविका, प्रभाग क्रमांक 16

बातम्या आणखी आहेत...