आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासूर्यनारायणाच्या साेबतच स्वरही आपल्या व्यक्ततेचा आयाम बदलतात, प्रहर जसजसा पुढे सरकताे तसे स्वर, ताल आणि लयही सकारात्मकता दर्शवत श्रीराम चरणी विलीन हाेत तल्लीनतेची अनुभूती देतात आणि येणाऱ्या काळात आशा, आकांक्षा अन् स्वप्नपूर्ततेचे बळ देईल याची शाश्वती देतात. असे अष्टाैप्रहर स्वरहाेत्र रंगले श्री काळाराम चरणी.
श्री काळाराम संस्थान, नाशिक यांच्या वतीने पहाटेचा समयच नव्हे तर अगदी सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरातील शास्त्रीय संगीत, गायन, वादन क्षेत्रातील मान्यवर कलावंत तसेच नवोदित कलावंतांनी भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेनुसार संपूर्ण दिवसाच्या २४ तासातील ८ प्रहरात विविध थाटावर आधारित रागांची अष्टाैप्रहर स्वरहाेत्र या कार्यक्रमातून स्वरसेवा केली. रविवारी (दि. १) पहाटे ५.३० वाजेपासून ते उत्तररात्रीपर्यंत हा कार्यक्रम सुरू हाेता.
या कार्यक्रमाची संकल्पना विनायक रानडे यांची असून संयोजन श्री काळाराम संस्थानचे विश्वस्त अॅड. दत्तप्रसाद निकम यांनी केले. तर श्री काळाराम संस्थानचे अध्यक्ष व जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. उमेशचंद्र मोरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे शुभारंभ झाला. यावेळी विश्वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर व शुभम मंत्री, अविनाश बोडके यांच्यासह संस्थांनच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियाेजन केले हाेते. याप्रसंगी उद्योजक हेमंत राठी, कवी प्रकाश होळकर, लेखक शंकर बोऱ्हाडे, निरंजन शहा आदींसह मान्यवर उपस्थित होते.
प्रथम प्रहर : पहाटे ५ ते ६ काकड आरती झाली. त्यानंतर ६ ते ८.३० वाजेपर्यंत त्यानंतर सचिन चंद्रात्रे यांचे ध्रुपद गायन झाले. त्यांना दिगंबर सोनवणे (पखवाज ), रुद्राक्ष साक्रीकर (सारंगी ) यांनी साथसंगत केली. तर आसावरी खांडेकर राम नाम आणि रामरक्षा सादर केली, सहगायक स्नेह चिमलगी, उदय कुलकर्णी, चिन्मय भार्गवे, सूर गोखले, श्रावणी गीते होते. त्यानंतर प्रसिद्ध नृत्यागंणा डॉ. सुमुखी अथणी धृपद गायनावर आधारित कथक पुष्पांजली सादर केली. या कार्यक्रमाचे निवेदन स्वानंद बेदरकर यांनी केले
दुसरा प्रहर : सकाळी ८.३० ते ११ या दरम्यान अस्मिता सेवेकरी यांनी गायन सादर केले. साथसंगत संस्कार जाणोरकर (संवादिनी ) रसिक कुलकर्णी (तबला ) यांची होती. त्यानंतर उद्धव अष्टुरकर सतार वादन यांनी केले असून त्यांना साथसंगत गौरव तांबे (तबला ) यांची लाभली आहे. तसेच देवश्री नवघरे यांनी गायन केले. निवेदन पीयू- आरोळे शिरवाडकर यांनी केले.
तिसरा प्रहर: सकाळी ११ ते १.३० केतन इनामदार गायन केले. अथर्व वारे (तबला ) यांनी केली. त्यानंतर अनिल देठणकर व्हायोलिन वादन झाले. तसेच राजश्री वैरागकर यांचे गायन झाले असून त्यांना साथसंगत जयदेव वैरागकर यांनी तबलावादन केले. त्यानंतर जयदेव वैरागकर संवादिनी वादन केले. निवेदन स्मिता मालपुरे यांनी केले.
चौथा प्रहर : दुपारी १.३० ते ४ वाजता ज्ञानेश्वर कासार यांनी गायन केले. आदित्य कुलकर्णी यांनी तबलावादन केले. अमृता खटी गायन झाले असून साथसंगत जगदीश सोनवणे (तबला ), अनुराधा जोशी (संवादिनी ), यांनी केले आहे. त्यानंतर क्षितिजा शेवतेकर आणि लितीश जेठावा यांनी अनुक्रमे सतार व बासरी वादन केले. मधुरा बेळे यांचे गायन झाले. निवेदन सुनेत्रा महाजन यांनी केले पाचवा प्रहर : सायंकाळी ४ ते ६.३० या दरम्यान प्रितमा नाकील यांनी गायन झाले. दिव्या रानडे (संवादीनी ), दिगंबर सोनवणे (तबला), यांची होती. शिल्पा नाकील यांनी भरतनाट्यम सादर केले. मोहिनी उपासनी यांनी बासरी वादन केले, त्यांना साथसंगत गौरव तांबे (तबला ), ईश्वरी दसककर (की-बोर्ड ) यांनी केले. त्याचप्रमाणे डॉ. आशिष रानडे यांचे गायन झाले. सौरभ क्षीरसागर यांचे तबलावादन झाले. निवेदन स्नेहा रत्नपारखी यांनी केले.
सहावा प्रहर : सायंकाळी ६.३० ते रात्री ९ या वेळेत शंतनु गुणे यांचे गायन आणि नितीन वारे यांचे तबलावाद झाले. तसेच पंडित सुभाष दसककर संवादिनी वादन, सुरश्री दसककर संवादिनी सहवादन तर ईश्वरी दसककर कीबोर्ड सहवादन केले आहे. त्यांना साथसंगत सुजित काळे (तबला ) यांनी केली आहे. त्यानंतर साेनाली भुसारे-माेजाड यांचे गायन झाले. त्यांना तबल्यावर गाैरव तांबे यांनी साथसंगत केली. पं. प्रसाद खापर्डे यांचेही गायन झाले. या कार्यक्रमाचे निवेदन वंदना अत्रे यांनी केले .
सातवा प्रहर : रात्री ९ ते ११.३० यावेळेत विवेक केळकर, श्रेयसी राव, मिलिंद धटिंगण, प्रांजली बिरारी, मीना निकम यांनी विविध गीते सादर केली. सदानंद जाेशी यांंनी निवेदन केले. संवादिनवी सुवर्णा क्षीरसागर, तबल्यासाठी राजू भालेराव, कि-बाेर्डवर जितेंद्र साेनवणे यांनी साथसंगत केली. त्यानंतर समृद्ध कुटे यांचे बासरी वादन झाले.
आठवा प्रहर : रात्री ११.३० ते उत्तररात्रीपर्यंत कार्यक्रम रंगला. त्यात श्रीराम तत्त्ववादी यांचे गायन झाले. सारंग तत्ववादी (तबला ), ईश्वरीत दसककर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. त्यानंतर प्रतीक पंडित सतार वादन केले. तसेच पंडित शंकरराव वैरागकर यांचे गायन झाले. निवेदन धनेश जोशी यांनी केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.