आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझाशीची राणी शेवटच्या श्वासापर्यंत लढली. मी झाशीच्या राणीच्या पायाची धूळही नाही. मात्र झाशीची राणी लढली तसे मला लढायचे होते. झाशीच्या राणीचा शेवट झाला नाही. त्यांचे नाव इतिहासात अमर झाले. तशीच आपलीही इतिहास दखल घेईल, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार शुभांगी पाटील यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्या भावना अनावर झाल्या.
शुभांगी पाटील म्हणाल्या, मला 40 हजार मते मिळाली. ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती. यात जनशक्तीने माझ्यावर विश्वास दाखवत 40 हजार मते मला दिली. माझ्या घरात कधी सरपंच नव्हता. राजकीय नातीगोती नव्हती. शिवसेनेने, मातोश्रीने, महाविकास आघाडीने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याची ही 40 हजार मते आहेत. हे ग्रेट मतदान आहे.
शिवसैनिकांचे आभार
शुभांगी पाटील म्हणाल्या, 3 टर्म ज्यांनी सत्ता भोगली. त्यांचे वारसाचे पर्व आता सुरू होत आहे. याठिकाणी कोण हरले तर जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शिक्षकांचा पराभव झाला. यामध्ये लढणाऱ्या हजारो शिक्षकांचा पराजय झाला. शिवसैनिकांचे आभार मानताना शुभांगी पाटील म्हणाल्या, एकतर्फी लढतीला तुमच्या बहिणीने चुरशीची करून ठेवले.
नाशिकमध्ये काय झाले?
गेल्या महिन्याभरापासून काँग्रेसमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, वेळेवर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.
मात्र, दुप्पट मते मिळवत सत्यजित ताबे यांनी शुभांगी पाटील यांचा पराभव केला. सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरीअखेर 68 हजार 999 मते मिळाली. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतांवर समाधान मानावे लागले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.