आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धवट रस्ताकाम:पालिका अधिकाऱ्यांना घेराव ; पाटीलनगर ते बडदेनगरच्या रस्त्यामुळे नागरिक हैराण

नाशिक6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उंटवाडी, पाटीलनगरपासून ते जुन्या सिडकोतील बडदेनगरपर्यंतचा अर्धवट रस्ता आठ महिन्यांपासून रखडल्याने ताे पूर्ण करण्याच्या मागणीसाठी परिसरातील रहिवाशांनी साेमवारी (दि. २१) दुपारी रस्त्यावर उतरत आंदाेलन केले. यावेळी घटनास्थळी आलेल्या पालिकेच्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंत्यांना घेराव घालत नागरिकांनी जाब विचारला.

महापालिकेने पाटीलनगर येथील सरस्वती विद्यालयापासून ते जुने बडदेनगरपर्यंतचा १८ मीटरच्या रस्त्याच्या भूमिपूजनाचा माेठा साेहळा शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत केला हाेता. त्यानंतर रस्ताकाम सुरू झाले हाेते. मात्र मध्येच हे काम रखडले. या रस्त्याच्या मध्यभागी भूसंपादन झालेले नसल्याने मनपाने तो भाग सोडून ८० टक्के रस्त्याचे काम पूर्ण केले.

बांधकाम विभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत सिडकोतील बांधकाम विभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकला असून रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे झालेले आहे. अर्धवट ठेवण्यात आलेल्या कामाची आयुक्तांनी चौकशी करावी. - अमोल नाईक

बातम्या आणखी आहेत...