आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Silver Ganesha Idols Are Preferred From 300 Rupees For Durva, 1300 For Jaswanda Necklaces And 4000 Rupees For Idols; 'Price' For Jewelery Too

चांदीच्या गणेशमूर्तींना पसंती:300 रुपयांपासून दुर्वा! जास्वंदाचे हार 1300 तर 4000 रुपयांपासून मूर्ती; दागिन्यांनाही 'भाव'

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने घराघरांमध्ये सजावटीच्या तयारीला वेग आला आहे. शहरातील सराफी पेढ्यांमध्ये साेने-चांदीच्या गणेशमुर्ती, अलंकार, दुर्वा, माेदक, जास्वंद हार यांसारख्या पुजेच्या वस्तुंना मागणी वाढली. अवघ्या 300 रूपयांपासून गणपती बाप्पाला प्रिय असलेल्या दुर्वा, 1300 रूपयांपासून जास्वंदाचे हार उपलब्ध आहेत.

प्लॅस्टर ऑफ पॅरीसला नकार देतांनाच अनेक घरांमध्ये आता थेट चांदीच्या गणेशमुर्ती स्थापित केल्या जात असून या मुर्ती अवघ्या 2100 रूपयांपासून उपलब्ध आहे. बुधवारी (ता. 31) गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. शहरातील अनेकजणांना आपल्या गणेशाला सोन्या-चांदीच्या का दागिन्यांनी मढवायची हौस असते. त्यानुसार नाजूक दुर्वा, मिनावर्क केलेली जास्वंदीची फुले, मोदक, रत्नजडित मुकुट, सुंदर हार, उंदीर यांसह असंख्य चांदी आणि सोन्याचे दागिने लाडक्या गणरायासाठी सराफी पेढ्यांत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सामान्यांच्या आवाक्यात असलेल्या या दागिन्यांना ग्राहकांची पसंती मिळत असून गणपतीच्या चांदी दागिन्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असल्याने कायमस्वरूपी दागिने हाेत असल्याने याला वर्षानुवर्ष पसंती वाढत चालली आहे.

ह्या वस्तुंना पसंती

पूजा साहित्यामध्ये दुर्वा, जास्वंदीच्या फुलांचे हार, कमळ, नारळ, शमीची पाने, तोरण, पाच फळांचे सेट, तबकडी, पंचपाळे, समई, दिवे, ताम्हण, पळी पंचपात्रे अशा वस्तूंचा समावेश आहे. सोन्याच्या वस्तूंनाही मागणी वाढली आहे. काही सराफांनी गणेश अलंकार, पूजा साहित्य असे सेट तयार केले आहेत.

दुर्वाची जुडी 300 तर जास्वंद फुलांची माळ 1300 आणि गणेशाची मुर्ती 4000 रूपयांपासून उपलब्ध असल्याने सर्वसामान्य ग्राहकांनाही ती परवडते. याचमुळे या वस्तुंची मागणी दरवर्षी वाढत चालली आहे. -गिरीश नवसे, अध्यक्ष, नाशिक सराफ असाेसिएशन

चांदी-साेन्याच्याही गणेशमुर्ती

चांदीमध्ये पुजा साहित्य, माेदक, मुशक यांचे वेगवेगळ्या वजनातील प्रकार तर साेने-चांदीच्या गणेशमुर्ती सराफांकडे उपलब्ध आहेत. भरपूर प्रकार आणि बजेटनुसार उपलब्धता यामुळे साेने-चांदीच्या गणेशमुर्ती, पुजेचे साहित्य यांची मागणी सातत्याने वाढत आहे. -मयुर शहाणे, सराफा व्यावसायिक.

बातम्या आणखी आहेत...