आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकची खेळाडू लईभारी !:डब्लूटीटी यूथ कंटेंडर आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत तनिशाला रजत पदक; मिळवले सहावे मानांकन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लिगानो इटली येथे डब्लूटीटी यूथ कंटेंडर टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या स्पर्धेत नाशिकची टेबलटेनिस पट्टू तानिशाने 17 वर्षाखालील मुलींच्या गटात रजत पटकावले. या स्पर्धेत तनिशाला सहावे मानांकन होते.

अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी उपांत्य फेरीत तिची गाठ पडली ती चौथे जागतिक मानांकन असलेल्या फ्रान्सच्या निकोल अरिएला हीचा अटीअटीच्या सामन्यात 3-0 पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत तिची गाठ पडली ती इजिप्त च्या जागतिक दुसरे मानांकन असलेल्या हाना गौडाशी. तिच्या बरोबर तनिशाला अंतिम फेरीत लढा देताना पराभवाला सामोरे जावे लागले. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी तिने ऑस्ट्रेलिया, युक्रेन, फ्रान्स, भारत, इटली च्या खेळाडूंचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. ती आता तेथूनच हंगेरी येथे चालू असलेल्या डब्लूटीटी यूथ कटेंडर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाली. तिथे ती 17 व 19 वर्षाखालील मुलींच्या गटाचे भारतीय संघा कडून प्रतिनिधित्व करणार आहे.

या वर्षी तिने जागतिक स्तरावर दूसरे रजत पदक मिळवले. जॉर्डन येथे झालेल्या डब्ल्यूटीटी यूथ कंटेंडर जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत तिने 17 व 19 वर्षाखालील मुलींच्या गटात रजत पदक पटकावले. यावर्षी तिची लाओस येथे झालेल्या एशियन युथ टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय संघात निवड झाली होती. ती जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

जय मोडक हे सुद्धा इटली आणि हंगेरी येथे चालू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांच्या संघाचे कोच म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. नाशिकचे सायली वाणी आणि कुशल चोपडा हे सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या चांगली कामगिरी करीत आहेत. तिच्या या यशामुळे नाशिकचे नाव पुन्हा एकदा जागतिक स्तरावर उंचावले गेले आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, मिलिंद कचोळे, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, संजय वसंत अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...