आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन‎:कार्यशाळेत 95 विद्यार्थ्यांना गायनाचे धडे‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध संगीतकार अशाेक पत्की आणि संजय पत्की यांच्या सुगम‎ संगीत कार्यशाळेत शहरातील ९५ विद्यार्थ्यांनी गायनाने धडे‎ गिरवले. स्वर कसे लावायचे, लयकारी आेम कसा म्हणायचा,‎ स्वर उच्चार कसा हवा याच्या टिप्स अशाेक पत्की यांनी‎ विद्यार्थ्यांना दिल्या. संजय पत्की यांनी स्वर अलंकार कसा‎ म्हणायचा, स्वर रियाज कसा करावा याची साेप्या भाषेत‎ माहिती दिली.

या कार्यशाळेला नाशिककरांनी भरगच्च‎ प्रतिसाद दिला.‎ नंदकुमार देशपांडे संचालित सरगम सुगम संगीत‎ अकादमीचा २२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यशाळा‎ झाली. भारतीय संगीताचा इतिहास कार्यशाळेतून उलगडुून‎ दाखविण्यात आला. पाश्चात्य संस्कृतीपेक्षा भारतीय संगीतातील‎ स्वर कसे उत्तम आहे आदींची माहिती देण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...