आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकहून सिन्नर औद्योगिक वसाहतीत दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो कामगार आणि उद्योजकांना सुखद धक्का बसला आहे. नाशिक रोड उड्डाणपूल ते दारणा नदीवरील पूलापर्यंतचा 5 किलोमीटरचा, तब्बल 4 वर्षे रखडलेला रस्ता वाहतुकीस खुला झाला आहे. यामुळे आता प्रत्यक्षात केवळ पंचवीस मिनिटांमध्ये द्वारका ते नाशिकरोड हे अंतर कापणे वाहनधारकांना शक्य झाले आहे.
नाशिक-पुणे महामार्गावरील रखडलेला हा रस्ता वाहनधारकांची डोकेदुखी बनला होता. हे काम मार्गी लावण्यासाठी उद्योजकांच्या संघटनांनी वारंवार मागणी केली होती. मात्र तरीदेखील जवळपास चार वर्ष या रस्त्याचे काम सुरू राहिले. मंगळवारी प्रत्यक्षात हे चौपदरी महामार्गाचे काम पूर्ण होऊन तो खुला करण्यात आल्याने उद्योजक कामगारांमध्ये समाधानाची भावना पाहायला मिळत आहे.
सात हजार कामगार, उद्योजक दिलासा
नाशिक तसेच नाशिक रोड व लगतच्या परिसरातून सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये किमान सात ते आठ हजार कामगार, उद्योजक व व्यावसायिक दररोज प्रवास करत असतात. त्यांच्यासाठी रखडलेला हा रस्ता मोठी डोकेदुखी ठरला होता. आता हा मार्ग खुला झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वीस ते पंचवीस मिनिटांची बचत
तब्बल पाच किलोमीटरचा हा रस्ता रखडला असल्याने द्वारका ते सिन्नर औद्योगिक वसाहत हे अंतर कापण्यास किमान 45 मिनिटे लागत होते. केवळ चोवीस मिनिटांमध्ये हे अंतर कापता आले. प्रत्येक वाहनाचा वीस ते पंचवीस मिनिटांचा वेळ यामुळे वाचणार आहे. -आशिष नहार, सेक्रेटरी, इंडियन आईस असोसिएशन
इंधन व वेळेची बचत प्रवासही सुखकर
हा रस्ता रखडल्यामुळे टोलचे पैसे आम्ही उगाच भरत आहोत असे नेहमी वाटायचे. मात्र आता थेट नाशिक रोड पर्यंत पोहोचता येत असल्याने, इंधन तसेच वेळेची बचत होत असून प्रवासही सुखकर होतो आहे. - अजय बाहेती, व्यवस्थापकीय संचालक, भगवती स्टील
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.