आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Sinnar Taluka Has The Highest Result Of 97.51 Percent In Nashik District; Special Proficiency To 40,000 Students In The Tenth |marathi News

यशाचा पहिला टप्पा:नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्याचा सर्वाधिक 97.51 टक्के निकाल; दहावीत40000 विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९६.३७ टक्के लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील ४० हजार विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य मिळाले आहे. तर ३३ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणी व १३ हजार विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश पटकावले आहे. सिन्नर तालुक्याचा सर्वाधिक निकाल ९७.५१ टक्के लागला आहे. तर देवळा, इगतपुरी, नांदगाव, येवला, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांचा निकाल ९७ टक्क्यांहून अधिक लागला आहे. नाशिक ग्रामीणचा निकाल ९६. ३५ टक्के तर महापालिका परिसरातील निकालाची टक्केवारी ९६.५१ टक्के आहे. नाशिक जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.४२ टक्के मुलींच्या उत्तीर्ण टक्केवारी ९७.४७ टक्के आहेत. राज्यात एकूण २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

गुणपडताळणीस २९पर्यंत तर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ९ जुलैपर्यंत अर्जाची संधी ऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गुणपडताळणीसाठी २० ते २९ जूनपर्यंत व छायाप्रतीसाठी २० जून ते ९ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.

पुरवणी परीक्षेसाठी २० जूनपासून आवेदनपत्र
दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी जुलै व ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा होणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार (दि. २०) पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून आॅनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहे. मंडळाकडून लवकरच स्वतंत्रपणे निर्गमित केले जाणार आहे.

शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या २५ हजार जागा
नाशिक
अकरावी प्रवेशासाठी यंदाही केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया राबविली जाणार आहे. नाशिकसह राज्यभरातील प्रमुख शहरांतील कनिष्ठ महाविद्यालयांत या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे. दहावीचा निकालापूर्वी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतंर्गत अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा ३० मेपासून सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत १३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. प्रवेश अर्जाचा भाग एक व भाग दोन या पद्धतीने प्रवेशाची सर्व प्रक्रिया होईल. नाशिक शहरात ६० कनिष्ठ महाविद्यालये असून त्यात कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त शाखा मिळून सुमारे २५ हजार जागा उपलब्ध आहेत.

नाशिकसह राज्यातील मुंबई, पुणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होईल. तर ग्रामीण भागात इतर शहरांमध्ये आॅफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होईल. ३० मेपासून https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेमाध्यमिक शाळा आणि मार्गदर्शक केंद्रांनी विद्यार्थ्यांनी भरलेले प्रवेश अर्ज भाग एकमधील माहिती तपासून प्रमाणित करणे अनिवार्य आहे.

बातम्या आणखी आहेत...