आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न समारंभ:भावाच्या लग्नात बहिणीचे 3 लाखांचे दागिने लंपास

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावाच्या लग्न समारंभासाठी आलेल्या मुंबई येथील महिलेचे दागिने आणि रक्कम असा ३ लाख ३० हजारांचा ऐवज ठेवलेली पर्स चोरी करण्यात आली. टाकळी राेड येथील जेजूरकर मळा परिसरातील एका लाॅन्समध्ये हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पाेलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि कल्याणी गाडेय (रा. सांताक्रुझ, मुंबई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लहान भावाच्या लग्नसमारंभासाठी त्या आल्या होत्या. लाॅन्समध्ये मावशी आणि आईसोबत हळदीचा कार्यक्रम आटोपून जेवणासाठी लाॅन्सच्या मागे गेल्या होत्या. जेवण करताना पर्स शेजारील खुर्चीवर ठेवली होती. जेवणाची डिश घेऊन आल्यानंतर तेथे पर्स दिसली नाही. लाॅन्समधील सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले असता पांढरा शर्ट घातलेला इसम पर्स चोरी करतांना दिसले. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...