आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ वाढ:डिप्लोमासाठी सहाव्यांदा मुदतवाढ; 11 पर्यंत संधी

नाशिक6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाॅलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जासाठी तब्बल सहाव्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. यावर्षी उपलब्ध जागांइतकेच अर्ज प्राप्त झाले आहेत.

सुधारित वेळापत्रकानुसार ११ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल. तर १८ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. पाॅलिटेक्निकसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यानंतर ३० जूनपर्यंत अर्जासाठी मुदत होती. त्यानंतर सलग सहा वेळा मुदतवाढ वाढ दिली. आता पुन्हा सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार ११ ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येईल. नाशिक जिल्ह्यात ९ ३०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

सुधारित वेळापत्रक २ जून ते ११ ऑगस्ट : ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत { १३ ऑगस्ट : तात्पुरती गुणवत्ता यादी होईल प्रसिद्ध { १४ ते १७ ऑगस्ट : आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत {१८ ऑगस्ट : अंतिम गुणवत्ता यादी

बातम्या आणखी आहेत...