आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक विचारांवर भर द्या‎:एस.के.डी. विद्यालयात‎ अंकिता इप्पर यांचे आवाहन‎

कळवण‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताण तणावांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी‎ खेळ व पुस्तके यांच्याशी मैत्री करून‎ सकारात्मक विचारांवर भर देण्याची गरज‎ असल्याचे प्रतिपादन अंकिता इप्पर यांनी‎ केले.‎ एस. के. डी. चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक‎ संचलित एस. के. डी. इंटरनॅशनल स्कूल व‎ व्ही. के. डी. इंग्लिश मीडियम स्कूल भावडे‎ आयोजित ‘तणावमुक्त जीवन'' या‎ विषयावरील चर्चासत्रात त्या बोलत होत्या.‎ अध्यक्षस्थानी संस्थापक संजय देवरे व प्रमुख‎ अतिथी म्हणून सचिव मीना देवरे उपस्थित‎ होत्या.‎

विद्यार्थ्यांनी तणावमुक्त जीवन जगून‎ आपला सर्वांगीण विकास कसा करावा.‎ विद्यार्थिदशेत येणाऱ्या तणावावर कसा ताबा‎ ठेवावा, अभ्यास कसा करावा, अभ्यासात‎ एकाग्रता कशी ठेवावी, शालेय जीवनात‎ मित्रांची पारख कशी करावी, तणावाचे‎ ॲक्यूट तणाव व क्रोनिक तणाव हे दोन प्रकार‎ समजावून सांगितले. वेळेचे नियोजन कसे‎ करावे इत्यादी बाबतीत ईप्पर यांनी सखोल‎ मार्गदर्शन केले. चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी‎ विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत त्यांनी त्यांच्या‎ शंकांचे निरसन केले. यावेळी प्राचार्य एस.‎ एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुधीर‎ सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.‎

बातम्या आणखी आहेत...